रुग्ण मतदारांसाठी विनामूल्य रुग्णवाहिका सेवा !
‘पश्चिम महाराष्ट्र एकता मंच’चा उपक्रम
नवी मुंबई – पश्चिम महाराष्ट्र एकता मंचच्या वतीने नवी मुंबईतील रुग्ण, तसेच वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली, अशी माहिती ‘पश्चिम महाराष्ट्र एकता मंच’चे अध्यक्ष योगेश चव्हाण यांनी दिली.
१. ‘पश्चिम महाराष्ट्र एकता मंच’च्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून सामजिक, शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. शासनाच्या वतीने अधिकाधिक मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा, यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत.
२. मतदानापासून कुणी वंचित राहू नये, यासाठी मंचच्या वतीने मतदारांना त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून विनामूल्य रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती.
३. मतदारांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांना ते आहेत त्या ठिकाणाहून (घर किंवा रुग्णालयापासून) मतदान केंद्रापर्यंत पोचवणे आणि पुन्हा घरी सोडणे यासाठी साहाय्य करण्यात आले.