महायुती अधिक जागांवर विजयी होण्‍याचे संकेत

महाराष्‍ट्रात मतदानोत्तर चाचण्‍यांचे अंदाज घोषित  

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया संपल्‍यानंतर विविध संस्‍थांच्‍या मतदानोत्तर चाचण्‍यांचे (एक्‍झिट पोल्‍सचे) अंदाज घोषित झाले आहेत. यांमधून यंदाच्‍या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्‍ट्रात कुणाची सत्ता येणार ? याविषयीचे संकेत मिळाले आहेत. यांमध्‍ये चाणक्‍य स्‍ट्रॅटेजी, पोल डायरी, इलेक्‍टोरल एज, मॅट्रिज यांनी हे अंदाज काढले आहेत.

१. चाणक्‍य स्‍ट्रॅटेजीनुसार निवडणुकीत महायुतीला १५२ ते १६० जागा मिळण्‍याची शक्‍यता आहे, तर महाविकास आघाडीला १३० ते १३८ जागांवर विजय मिळेल. भाजप राज्‍यातील सर्वांत मोठा पक्ष ठरण्‍याची शक्‍यता आहे. भाजपला ९० जागांवर विजय मिळेल. या अंदाजानुसार महाविकास आघाडीत काँग्रेस ६३ जागा मिळवत सर्वांत मोठा पक्ष ठरेल.

२. ‘पोल डायरी’नुसार महायुतीला १२२ ते १८६, तर महाविकास आघाडीला ६९ ते १२१ जागा मिळण्‍याची शक्‍यता आहे.

३. ‘इलेक्‍टोरल एज’नुसार भाजप ७८, काँग्रेस ६०, शरद पवार गट ४६, ठाकरे गट ४४, शिवसेना २६, राष्‍ट्रवादी काँग्रेस १४, तर इतर २० जागांवर विजय मिळेल.

४. ‘मॅट्रिझ’नुसार महायुतीला १५० ते १७० जागा मिळतील. मविआला ११० ते १३०, तर इतर पक्षांना ८ ते १० जागांवर विजय मिळेल.