Karimganj Renamed As SriBhumi : आसाममधील मुसलमानबहुल ‘करीमगंज’ जिल्ह्याचे नाव पालटून ‘श्री भूमी’ ठेवले !
आसाममधील भाजप सरकारचा निर्णय
गौहत्ती (आसाम) – आसाममधील मुसलमानबहुल ‘करीमगंज’ जिल्ह्याचे नाव पालटून ‘श्री भूमी’ करण्यात आले आहे. १९ नोव्हेंबरला झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘या निर्णयामुळे जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा दिसून येईल’, असे सरकारने म्हटले आहे.
याविषयी मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा म्हणाले की, बंगाली किंवा आसामी भाषेत ‘करीमगंज’ हा शब्द नाही. ज्यांना भाषिक आधार नाही अशी नावे आम्ही पालटू. वर्ष १९१९ मध्ये येथे आलेले गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी या भागाला ‘श्री भूमी’ म्हटले होते.
संपादकीय भूमिकाएकेक राज्यांनी असा पालट करत रहाण्यापेक्षा केंद्र सरकारने संपूर्ण देशांतील गुलामगिरीची नावे शोधून ती स्थानिक माहितीनुसार पालटण्याचा आदेश देणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते ! |