भाजपच्या उमेदवाराच्या बहिणीवर जीवघेणे आक्रमण !
अमरावती – धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर १८ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजता जीवघेणे आक्रमण करण्यात आले. यात त्या गंभीर घायाळ झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यांच्या बहिणीचे नाव अर्चना रोठे असे आहे. त्या निवडणुकीचा प्रचार करून घरी परतत होत्या. आक्रमण करणारे लोक अंधारात पसार झाले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.