‘अफझलशाही विचार’ रोखण्यासाठी विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान होणे आवश्यक !
सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता (श्री.) अश्विनी कुमार उपाध्याय यांचे आवाहन
मुंबई – एकीकडे हिंदु बांधव जातीयवादात अडकले आहेत, तर दुसरीकडे सगळे अफझल, बाबर, तुघलक, घोरी, गझनी, औरंगजेब एकत्र झाले आहेत. जोपर्यंत हिंदू बहुसंख्य आहेत, तोपर्यंत राज्यघटना सुरक्षित आहे. त्यामुळे ‘अफझलशाही विचार’ रोखण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान होणे आवश्यक आहे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता (श्री.) अश्विनी कुमार उपाध्याय यांनी एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.
ते म्हणाले,…
१. सनातन धर्माला वाचवण्यासाठी जे युद्ध झाले, ते महाराष्ट्राच्या धर्तीवर झाले. छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आपण सर्वजण धर्मांतरित झालो असतो.
२. संध्या लोकसंख्येत होणारा वाढता पालट थांबवणे अत्यंत आवश्यक आहे.
३. देशात ‘लोकसंख्या जिहाद’, ‘धर्मांतर जिहाद’, ‘घुसखोरी जिहाद’ आणि ‘व्होट जिहाद’ मोठ्या प्रमाणात घडत आहेत. कोल्हापूरच्या एका सैन्य अधिकार्याच्या दोन मुलींपैकी एका मुलीला ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यासंदर्भात जनहित याचिका प्रविष्ट झाली. त्यानंतर संशोधन केल्यावर महाराष्ट्रातून गेल्या ३ वर्षांत १ लाख मुली बेपत्ता झाल्या आहेत, हे लक्षात आले. ‘लव्ह जिहाद’ हा राष्ट्राच्या सुरक्षेला, देशाच्या एकता-अखंडतेला निर्माण झालेला धोका आहे.
४. ‘लव्ह जिहाद’ करणार्यांच्या विरोधात ‘यूएपीए’, ‘मकोका’, ‘देशद्रोहा’सारखे कायदे लावले गेले पाहिजेत. अशा आरोपींना जे पाठीशी घालतात त्यांच्यावरही कडक कारवाई व्हायला हवी.
५. प्रारंभी ‘व्होट जिहाद’ छुप्या पद्धतीने केला जात होता. आता तो उघडपणे केला जात आहे. पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत, फतवे निघत आहेत.
६. जनतेने जर मतदानाच्या दिवशी १०० टक्के मतदान केले नाही आणि सुट्टी साजरी केली, तर सर्वांचे भविष्य धोक्यात आहे.
७. मतदारांनी योग्य व्यक्तीला मतदान करणे महत्त्वाचे आहे. विरोधकांना आरसा दाखवण्याची आता वेळ आली आहे.