हिंदु असल्याची लाज वाटत असेल, तर शरद पवारांनी ते हिंदु नाहीत, असे सांगावे ! – किरीट सोमय्या
पिंपरी-चिंचवड – ‘व्होट जिहाद’ वरून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. ‘भाजपने आरोप करणार्या शरद पवारांना हिंदु असल्याची लाज वाटत असेल, तर त्यांनी ते हिंदु नाहीत’, असे सांगावे, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
पुणे येथे लव्ह जिहादच्या अनेक घटना घडल्या आहेत. निवडणुकीत आणि आचारसंहितेच्या काळात पैसे वाटण्यात आले आहेत. ‘व्होट जिहाद’चा फटका या वेळी महाविकास आघाडीला बसणार आहे; कारण हिंदु समाजातील नागरिक आता जागे झाले आहेत. त्यांनी लव्ह जिहाद आणि व्होट जिहाद यांच्या विरोधात मतदान करण्याचे ठरवले आहे. पवार हे कायम पुणे येथील विशिष्ट समाजाबद्दल टीकात्मक बोलतात; मात्र त्यांच्या भाषणात ते इतर धर्मीय संकटात असल्याचे सांगतात, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाअन्य धर्मियांचे लांगूलचालन करणार्या राजकारण्यांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्यायला हवी ! |