साधकांनो, आश्रमातील अन्‍नपूर्णा कक्षातील (स्‍वयंपाकघरातील) सेवांमध्‍ये सहभागी होऊन स्‍वतःची आध्‍यात्मिक उन्‍नती करून घ्‍या !

चैतन्‍यदायी रामनाथी आश्रमात सेवानंद अनुभवण्‍याची अमूल्‍य संधी !

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

सनातनचा रामनाथी आश्रम म्‍हणजे चैतन्‍याचा स्रोत ! रामनाथी आश्रमातील साधकांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत असून अन्‍नपूर्णा कक्षातील (स्‍वयंपाकघरातील) विविध सेवांसाठी साधकसंख्‍या अपुरी पडत आहे. या सेवा करण्‍यासाठी शारीरिक क्षमता असलेल्‍या स्‍त्री आणि पुरुष साधकांची आवश्‍यकता आहे. यात पुरुष साधकांची प्राधान्‍याने आवश्‍यकता आहे. इच्‍छुक साधक पूर्णवेळ अथवा न्‍यूनतम २० दिवस आश्रमात राहून सेवेच्‍या या संधीचा लाभ घेऊ शकतात. ही सेवा करू शकणार्‍या किंवा शिकून घेण्‍याची सिद्धता असलेल्‍या साधकांनी जिल्‍हासेवकांच्‍या माध्‍यमातून बाजूच्‍या सारणीनुसार आपली माहिती पाठवावी.

अन्‍नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्‍याग होतो. ही सेवा करून शीघ्रतेने आध्‍यात्मिक उन्‍नती केलेल्‍या अनेक साधकांची उदाहरणे आहेत. त्‍यामुळे साधकहो, या सेवेतून जलद आध्‍यात्मिक उन्‍नती करण्‍याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका !

नाव आणि संपर्क क्रमांक

सौ. भाग्‍यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com

टपालाचा पत्ता : सौ. भाग्‍यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१ (९.११.२०२४)