राजकीय लाभासाठी ब्राह्मण समाजाच्‍या भावना दुखावणार्‍या महाविकास आघाडीवर कारवाई करावी !

अ.भा. ब्राह्मण महासंघाच्‍या वतीने निवडणूक आयोगाला निवेदन

निवडणूक आयोगाला निवेदन सादर करतांना संघटनेचे पदाधिकारी

पुणे – महाराष्‍ट्रातील बहुतांश मुख्‍य वृत्तपत्रात १६ नोव्‍हेंबर या दिवशी महाविकास आघाडीचे निवडणुकीच्‍या संदर्भातील संपूर्ण पानभर विज्ञापन प्रसिद्ध झाले होते. विज्ञापनातील उल्लेख ‘पहिल्‍या अनाजीने स्‍वराज्‍याला लुटले आणि दुसर्‍याने अवघ्‍या महाराष्‍ट्राचे अन् शेतकर्‍यांचे स्‍वप्‍न उद़्‍ध्‍वस्‍त केले’, अशा आशयाचे लिखाण आहे. या विज्ञापनातून महाविकास आघाडीने ब्राह्मण समाजाच्‍या भावना दुखावण्‍याचा प्रयत्न केला आहे, जे अतिशय निंदनीय आहे. समाजात जातीय तेढ निर्माण करण्‍याच्‍या प्रयत्नाने आचारसंहिता नियमांचे उल्लंघन केले आहे. त्‍यामुळे अशा जातीय तेढ निर्माण करणार्‍या विज्ञापनांमुळे आचारसंहितेचा भंग झालेला असून महाविकास आघाडीवर त्‍वरित कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’च्‍या वतीने पिपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीच्‍या वतीने करण्‍यात आली. ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’च्‍या वतीने या विज्ञापनाचा आणि महाविकास आघाडीचा तीव्र निषेध करून निवडणूक आयोगाला महाविकास आघाडीवर कारवाई करण्‍याच्‍या मागणीचे निवेदन देण्‍यात आले.