डोक्यावरची भगवी टोपी खाली टाकणार्या राजेंद्र लाटकारांचा सकल हिंदु समाजाच्या वतीने निषेध !
कोल्हापूर – प्रचाराच्या कालावधीत कोल्हापूर शहर उत्तर मतदारसंघातील उमेदवार राजेश लाटकर यांनी त्यांच्या डोक्यावर असलेली भगवी टोपी खाली टाकल्याचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारीत झाला आहे. हा मतांसाठी केलेला लाचारीपणा असून स्वाभिमानी जनता हे कधीही विसरणार नाही. त्यामुळे डोक्यावरची भगवी टोपी खाली टाकणार्या राजेश लाटकर यांचा सकल हिंदु समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन निषेध करण्यात आला.
या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, हिंदु महासभेचे
श्री. विकास जाधव आणि श्री. राजेंद्र तोरस्कर यांसह अन्य उपस्थित होते. या प्रसंगी श्री. गजानन तोडकर म्हणाले, ‘‘या प्रचाराच्या कालावधीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील तिथे होते. यानंतर याविषयी राजेश लाटकर यांनी क्षमायाचना केलेली नाही.’’
ते पुढे म्हणाले की, त्यामुळे जनतेने २० नोव्हेंबला होणार्या मतदानातून त्यांच्या भावना व्यक्त करून धनुष्यबाणासमोरील बटण दाबून भगव्याचा अवमान करणार्यांना घरी बसवावे, असे आवाहन आम्ही करतो.