US Slams Bangladesh : आम्ही शांततामय निदर्शनांमध्ये किंवा हिंसक कृतींमध्ये बांगलादेश सरकारच्या सहभागाचे समर्थन करत नाही
अमेरिकेने बांगलादेश सरकारला सुनावले !
वॉशिंग्टन (अमेरिका) : अमेरिकेने बांगलादेशला स्पष्ट केले की, ती शांततामय निदर्शनांमध्ये किंवा हिंसक कृतींमध्ये सरकारच्या सहभागाचे समर्थन करत नाही. अलीकडेच चितगावमध्ये हिंदू आणि बांगलादेशी सुरक्षादल यांच्यात झालेल्या चकमकीनंतर हे विधान आले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की, मी बांगलादेश सरकारला हे स्पष्ट करतो की, आम्ही शांततापूर्ण निषेधाच्या अधिकाराचे समर्थन करतो आणि हिंसक प्रतिक्रियांमध्ये कोणत्याही सरकारी सहभागाला विरोध करतो.
यापूर्वी भारताने ६ नोव्हेंबर या दिवशी हिंदूंवर झालेल्या आक्रमणाचा निषेध केला होता आणि अशा कृतीमुळे समाजात तणाव निर्माण होईल, असे म्हटले होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले होते की, आम्ही बांगलादेशातील चितगावमध्ये हिंदूंवर झालेल्या आक्रमणांंच्या बातम्या पाहिल्या आहेत. सामाजिक माध्यमांत हिंदु धार्मिक संघटनांविरोधात प्रक्षोभक पोस्ट प्रसारित केल्यानंतर त्यांच्या मालमत्ता आणि व्यावसायिक आस्थापन यांची लूट करण्यात आली. आम्ही बांगलादेश सरकारला त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची विनंती केली. या प्रक्षोभक पोस्ट आणि गुन्हेगारी कारवाया यांमागे आतंकवादी घटक आहेत. अशा घटना समाजात तणाव निर्माण करतात. आम्ही पुन्हा एकदा बांगलादेशी सरकारला या आतंकवादी घटकांवर कारवाई करण्याचे आवाहन करतो.
संपादकीय भूमिकाबांगलादेशात सध्या जी काही स्थिती आहे, त्यामागे अमेरिका आहे, हे उघड सत्य आहे. त्यामुळे अमेरिकेने अशा प्रकारची कितीही विधाने केली, तरी त्याला काही विशेष अर्थ नाही. अमेरिकेने बांगलादेशातील स्थिती पूर्ववत् करण्यासाठी प्रत्यक्ष कृती केली, तरच त्याला महत्त्व राहील ! |