ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांच्या रॅलीत जिहादची घोषणा !
नाशिक – येथील ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचारफेरीमध्ये ‘एकबार फिर जिहाद का नारा देता हूँ और इस जिहाद के लिए मेरा मुस्लिम समाज इस बार भी तैयार है’, अशी घोषणा देण्यात आली. याविषयीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे.
‘मुसलमान शब्दाचे पक्के असतात. आम्ही आमचे काम करून दाखवू’, असे ‘आश्वासन’ देत ही घोषणा देण्यात आली. या व्हिडिओमध्ये वसंत गीते आणि त्यांचे कार्यकर्ते मुसलमानांसमवेत दिसून येत आहेत.
संपादकीय भूमिकाअशांविरुद्ध निवडणूक आयोग तात्काळ कारवाई करणार का ? |