G20 IndiaChina Meet : डेमचोक आणि देपसांग येथून सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेचा घेतला आढावा !

भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी घेतली चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि  चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी : सैन्य माघारी घेण्याच्या प्रक्रियेचा आढावा

रिओ दि जानेरो (ब्राझिल) : ब्राझिलमधील रिओ दि जानेरो येथे जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पूर्व लडाखमधील डेमचोक आणि देपसांग येथून सैन्य माघारी घेण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेतला. सैन्य मागे घेण्याचा निर्णय झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिली उच्चस्तरीय बैठक होती.

वांग यांच्यासमेवत झालेल्या चर्चेनंतर डॉ. जयशंकर म्हणाले की, आम्ही भारत आणि चीन यांच्या द्विपक्षीय संबंध पुढील टप्प्यावर नेण्याविषयी चर्चा केली. तसेच जागतिक परिस्थितीवरही चर्चा केली. गेल्या महिन्यात भारत आणि चीन यांच्या सैन्यदलांनी डेमचोक आणि देपसांगमध्ये माघार घेण्याची प्रक्रिया चालू केली होती. अनुमाने साडेचार वर्षांनंतर दोन्ही बाजूंनी दोन्ही भागात गस्त घालण्याचे काम पुन्हा चालू केले आहे.