ट्रम्प प्रशासन अमेरिकेतील घुसखोरांना बाहेर काढण्याच्या सिद्धतेत !
वॉशिंग्टन – अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी नुकतेच सांगितले की, त्यांचे प्रशासन राष्ट्रीय आणीबाणी घोषित करेल आणि देशात अवैधरित्या रहाणार्या स्थलांतरित लोकांच्या विरोधात सैन्यदलाचा वापर करून त्यांना देशातून बाहेर काढेल. डॉनल्ड ट्रम्प यांनी ‘एक्स’ वर प्रसारित केलेल्या ‘पोस्ट’मध्ये ही माहिती दिली आहे.
१. ट्रम्प प्रशासन प्रथम ४ लाख २५ सहस्र अवैध स्थलांतरितांना बाहेर काढेल. या स्थलांतरितांच्या विरोधात गुन्हे नोंद आहेत. याखेरीज सर्व स्थलांतरितांना कायद्यात नमूद केलेल्या योग्य प्रक्रियेचे पालन करण्याची संधी मिळेल, असे माजी पोलीस अधिकारी टॉम होमन यांनी सांगितले.
२. अमेरिकेत अवैधरित्या घुसलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात बाहेर काढल्यास अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. ‘अमेरिकन इमिग्रेशन कौन्सिल’ने म्हटले आहे की, या निर्णयामुळे बांधकाम, कृषीआदी क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाचे गंभीर संकट निर्माण होऊ शकते.
संपादकीय भूमिकाभारताने अमेरिकेकडून बोध घेतला पाहिजे ! |