अमेरिकेने बांगलादेशावर आर्थिक निर्बंध लादण्यासाठी अमेरिकेतील भारतीय वंशाचे नागरिक प्रयत्नशील !
वॉशिंग्टन – अमेरिकेतील भारतीय वंशाचे नागरिक बांगलादेश सरकारच्या विरोधात आर्थिक निर्बंधांसह कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी नवनिर्वाचित डोनाल्ड ट्रम्प प्रशासन आणि काँग्रेस यांच्याशी संपर्क साधण्याच्या दिशेने काम करत आहेत. भारतीय-अमेरिकी समुदायाच्या एका प्रभावशाली नेत्याने ही माहिती दिली. भारतीय-अमेरिकी वैद्य डॉ. भरत बराई यांनी विश्वास व्यक्त केला की, डॉनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांची नोंद घेऊन बांगलादेशाच्या विरुद्ध कारवाई करतील.
१. बराई यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ट्रम्प यांनी बांगलादेशी हिंदू आणि हिंदूंची मंदिरे यांच्यावरील आक्रमणाविषयी धाडसी विधान केले आहे. ‘ट्रम्प ही एक धाडसी व्यक्ती आहे, जी बांगलादेशातील परिस्थिती सुधारली नाही तर आर्थिक निर्बंधांचा विचार करू शकते’, असे ते म्हणाले.
२.महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशाचे काळजीवाहू सरकार हे सैन्यदलाच्या नियंत्रणाखालील केवळ एक कठपुतळी आहे, असा आरोप बराई यांनी केला.
३. बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्य यांच्यावरील अत्याचार थांबवण्यासाठी पावले उचलली जातील, असा विश्वास बराई यांनी व्यक्त केला.
४. ट्रम्प यांनी ५ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी दिलेल्या निवेदनात बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाचा निषेध केला होता.
संपादकीय भूमिकाहिंदूंवर अत्याचार करणार्या बांगलादेशावर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करणार्या अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांचे अभिनंदन ! भारतातील किती हिंदूंनी बांगलादेशात हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवला आहे ? |