अजित पवार यांनाही आम्ही भगवे करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री भाजप
मुंबई – अजित पवार यांच्यासमवेत आमची संपूर्ण विचारसरणी जुळली असती, तर त्यांचा वेगळा पक्ष कसा राहिला असता ? आम्ही आधीच घोषित केले आहे की, आमची आणि अजित पवार यांची राजकीय युती आहे. हळूहळू तेही आमच्या विचारांचे होतील. अजित पवार यांनाही आम्ही भगवे करू, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी ‘टी.व्ही.९’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘अजित पवार हे अन्य पक्षातून आमच्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना आमच्या गोष्टी लक्षात येत नसतील. त्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा ठीक नसल्याचे म्हटले असले, तरी त्यांनी ‘एक है तो सेफ है’ ही घोषणा ठीक असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ ग्लास अर्धा रिकामा आहे. अजित पवार यांना ‘ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणू नका, ग्लास अर्धा भरलेला आहे म्हणा’, असे सांगायला हवे. आम्हाला त्यांची भूमिका मान्य आहे.’’