कोरगाव (गोवा) पंचायतीच्या सरपंचपदी अब्दुल करीम यांची निवड केल्याने गावात तीव्र नापसंती !
अब्दुल यांना सरपंचपदावरून पायउतार करा, अन्यथा गोवाभर पडसाद उमटण्याची ‘गोवा हिंदू युवक शक्ती’ संघटनेच्या सभेत चेतावणी
म्हापसा, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – कोरगाव पंचायतीच्या सरपंचपदी अब्दुल करीम नाईक यांची निवड झाल्याने याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले आहेत. ‘गोवा हिंदू युवक शक्ती’ या शीर्षकाखाली गोव्यातील विविध हिंदु संघटनांनी कोरगाव येथील श्री भूमिका मंदिरात १७ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी सभा घेऊन सरपंचपदी अब्दुल यांची निवड झाल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. अब्दुल यांना सरपंचपदावरून पायउतार करा, अन्यथा याचे पडसाद गोवाभर उमटण्याची चेतावणी या सभेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. सभेला शेकडो नागरिक उपस्थित होते.
अब्दुल यांना सरपंचपदासाठी एकूण ४ पंचसदस्यांनी पाठिंबा दिला. यामध्ये ३ पंचसदस्य या हिंदु भगिनी आहेत. अब्दुल यांना सरपंचपदासाठी पाठिंबा देऊन या हिंदु भगिनींनी समस्त हिंदूंना अपकीर्त केले आहे. यासाठी संबंधित महिला पंचसदस्यांनी तातडीने आमच्याशी चर्चा करावी आणि अब्दुल यांना सरपंचपदावरून पायउतार करावे. अब्दुल यांना सरपंचपदासाठी पाठिंबा देणार्यांनी पाठिंबा मागे न घेतल्यास त्या पंचसदस्यांच्या घरावर धडक देऊन त्यांना खडसावण्यात येणार आहे, अशी चेतावणी या सभेत देण्यात आली. श्री भूमिका मंदिराच्या सभागृहात झालेल्या या सभेत मडगाव, म्हापसा, पणजी, फोंडा, वास्को आदी भागांतून मोठ्या प्रमाणावर विविध संघटनांचे सदस्य जमा झाले होते. यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात वाटा होता. या वेळी व्यासपिठावर सर्वश्री सुजन नाईक, मिलिंद पेडणेकर, रवींद्र रेडकर, जयेश नाईक, विनोद वारखंडकर, अरुण शेट्ये, गणेश नार्वेकर, प्रशांत राऊत, देवानंद गावडे, विनायक कवठणकर, गोविंद चोडणकर, सौ. राजश्री गडेकर, नम्रता परुळेकर आदींची उपस्थिती होती.
सभेत वक्त्यांच्या संबोधनामधून पुढील सूर उमटला. ‘अब्दुलसारख्यांना गोव्यातील राजकारणात थारा देऊ नये. अब्दुला यांना पाठिंबा देणार्यांची नीती योग्य नाही, तर काहींनी पैशांच्या लालसेपोटी त्यांना हा पाठिंबा दिला आहे. काही मुसलमान जिहादच्या नावाखाली गोव्यात आणि देशभरात मोठ्या प्रमाणात कारवाया करत आहेत. हिंदु संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवण्यासाठी आजच्या तरुणांना चांगले मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. घरातील ज्येष्ठ नागरिकांनी मुलांवर चांगले संस्कार करण्याची आवश्यकता आहे. काही राजकारणी स्वार्थासाठी हिंदु धर्म आणि हिंदू यांचा वापर करत आहेत. यासाठी आमच्या मुलांना राजकारण्यांच्या नादी लावून त्यांना व्यसनाधीन बनवू नये.’’ भाजपचे स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनी अब्दुल यांची सरपंचपदी निवड होण्याच्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग नसल्याचे कळवले आहे.
कोरगावच्या सरपंचपदी एका ‘कसाब’ची निवड !
सभेतील वक्ते प्रशांत राऊळ यांनी सभेत बोलतांना कोरगाव पंचायतीच्या सरपंचपदी अब्दुल यांना बसवून ४ पंचसदस्यांनी एका ‘कसाब’ची गावच्या प्रमुखपदी निवड केल्याचा आरोप केला.