तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांना साधकाला गुरुकृपेने सुचलेली कवने !

वर्ष २०२४ मध्ये सप्टेंबर मासात पितृपक्षाला आरंभ झाल्यापासून मला तीव्र स्वरूपाचा आध्यात्मिक त्रास होऊ लागला. सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी त्या त्रासाने टोक गाठले. नवरात्रीला आरंभ होताच पुढील काही दिवसांत मला काही कविता सुचल्या. त्या श्री मां जगदंबा आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करतो.

gurupournima

श्री. धैवत वाघमारे

गुरुकृपा

अंतःकरणी ठसली तव मूर्ती ।
करावीस कृपा हे करुणामूर्ती ।। १ ।।

कृपासिंधु तू वात्सल्यमूर्ती ।
आस मम मनी पहावी चिद्घनमूर्ती ।। २ ।।

भाव न ठसला कधी मम हृदयी ।
परि तळमळे चित्त पहाण्या कृपामयी ।। ३ ।।

तळमळे धडपडे मम मन ।
परि न होई कधी स्मरण ।। ४ ।।

साद ऐकीली त्वा लेकराची ।
स्मरण होताच लाभे शांती चित्तासी ।। ५ ।।

ऐसे करुणाकर जगदंबा नि गुरुदेव ।
घेती उचलूनी मज कडेवर सदैव ।। ६ ।।

– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१०.२०२४)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक