५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. यशदा गौरीश पुराणिक (वय ३ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. यशदा गौरीश पुराणिक ही या पिढीतील एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
चि. यशदा गौरीश पुराणिक (वय ३ वर्षे) हिची तिच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सौ. सायली गौरीश पुराणिक (यशदाची आई)आणि श्री. गौरीश नागेश पुराणिक (यशदाचे वडील), पुणे.
१. जन्म ते ६ मास
१ अ. शांत : ‘यशदा शांत होती. ती विनाकारण रडत नसे.
१ आ. स्तोत्र आणि नामजप ऐकायला आवडणे : प्रतिदिन अंघोळीनंतर देवीकवच आणि संध्याकाळी शुंभकरोती, गणपति स्तोत्र, मारुति स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र म्हटले नाही, तर त्या ठराविक वेळी ती रडत असे आणि स्तोत्र म्हटल्यानंतर शांत होत असे. ती झोपतांना भ्रमणभाषवर दत्तगुरूंची करुणात्रिपदी ऐकत शांतपणे झोपत असे. तिला दत्ताचा जप आवडायचा. त्या वेळी ती हसायची. दत्ताचा जप चालू असतांना अन्य देवतांचा जप लावला, तर ‘तिला ते कळले आहे’, अशा प्रकारे ती आमच्याकडे पाहून शांत व्हायची.
२. ६ मास ते ९ मास
अ. तिला श्रीकृष्णाच्या चित्रासमोर नेल्यावर ती एकटक पहात रहायची. तिच्यासमोर ‘विठ्ठल विठ्ठल’ असे म्हटल्यावर ती दोन्ही हातांनी टाळ्या वाजवायची.
आ. ती सर्वांकडे लगेच जायची आणि ‘आई-बाबाच जवळ हवेत’, असे तिचे नसायचे.
३. वय १ वर्ष ते ३ वर्षे
अ. यशदाला दैवी बालकांच्या ध्वनीचित्रफिती पहायला आवडते आणि नंतर ती त्यांतील सूत्रे सांगते.
आ. तिला सर्व गोष्टी व्यवस्थितपणे केलेल्या आवडतात.
इ. घरकामात साहाय्य करणे : यशदाला घरातील कामांमध्ये साहाय्य करायला आवडते, उदा. जेवण झाल्यानंतर भांडी उचलून ठेवणे, आईला भाजी निवडण्यात साहाय्य करणे.’
श्रीमती हेमांगी नागेश पुराणिक (यशदाची आजी, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६४ वर्षे), गावभाग, सांगली.
१. हसतमुख आणि आनंदी : ‘लहानपणी चि. यशदा हसतमुख, आनंदी आणि मनाने पुष्कळ चांगली वाटायची. ‘तिच्याकडे पाहिल्यावर ती माझ्याकडे पुष्कळ ओळख असल्याप्रमाणे प्रेमाने पहात आहे’, असे वाटायचे. तिला पाहून मला आनंद मिळायचा.
२. निरीक्षणक्षमता : आम्ही दोघे (आजी-आजोबा) नामजप करायचो. तेव्हा यशदा आरंभी शांतपणे जप ऐकायची आणि नंतर स्वतः मान हालवून, ओठांची हालचाल करून, थोडासा आवाज करीत ‘जसे काही ती नामजप करत आहे’, अशा हालचाली करायची.
३. श्रीकृष्णावर प्रीती : तिला लहानपणी ‘कृष्णबाप्पा कुठे आहे ?’, असे विचारल्यावर ती श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहायची. आता खेळ खेळतांना ती मधेच कृष्णाच्या चित्राकडे पाहून त्याच्याशी बोलते. तसेच ‘कृष्ण आपल्याकडे पाहून हसला, मी कृष्णाला लोणी भरवते, कृष्ण माझे ऐकत नाही’, असे सांगत असते. ती कधी कधी कृष्णाकडे हसून पहाते. ती ‘कृष्णाची राधा आहे’, असे सांगते.
४. आध्यात्मिक स्तरावरील उपाय करायला आवडणे : मी कापूर, विभूती आणि अत्तर लावते. आधी मी तिला आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यासाठी माझ्याजवळ बोलवायचे. आता ती स्वतःच मला त्या उपायांची आठवण करते. ती उपायांचे साहित्य ठेवायची पिशवी घेऊन येते आणि मला उपाय करण्यासाठी सांगते. तिला आध्यात्मिक स्तरावरील उपाय करायला आवडतात.
५. चांगली स्मरणशक्ती : यशदाला एकदा काही सांगितले की, लक्षात रहाते. वयाच्या मानाने तिला बरीच स्तोत्रे येतात. तिचे बाबा तिच्याकडून प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी स्तोत्रे म्हणून घेतात.’
सौ. इंद्राणी ऋषिकेश कुलकर्णी (यशदाची आत्या), पुणे
१. चांगली स्मरणशक्ती : ‘यशदाची छायाचित्रे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना दाखवल्यावर त्यांनी ‘बाळ हुशार आहे’, असे म्हटले होते. त्याची प्रचीती आम्हाला येत आहे. तिला शिकवलेल्या गोष्टी, तिने पाहिलेली ठिकाणे आणि माणसे यांचा ती मधेच उल्लेख करते.
२. गणेशतत्त्व अधिक जाणवणे : यशदाचा जन्म होण्यापूर्वी मी आणि माझे यजमान पाली येथील गणपतीच्या देवळात दर्शनासाठी गेलो होतो. तेथे मी गणपतीला सौ. सायलीला होणार्या बाळासाठी पुष्कळ मनापासून प्रार्थना केली. ‘बाळामध्ये गणेशतत्त्व अधिक प्रमाणात असेल’, असा विचार माझ्या मनात आला. प्रत्यक्षात यशदा लहान असतांना तिच्याकडे पाहून गणपतीचीच आठवण व्हायची. ती बालगणेशाप्रमाणे गोड दिसत असे. माझ्या एका साधक मैत्रिणीनेही ‘यशदाकडे पाहून तिच्यात गणेशतत्त्व अधिक जाणवते’, असे सांगितले.
३. देवीचे रूप जाणवणे : आम्ही एका तीर्थक्षेत्री २ – ३ दिवसांसाठी निवासासाठी होतो. तेथे बरीच कुटुंबे निवासाकरीता होती. त्या सर्वांना आणि विधी करणार्या पुरोहितांना यशदा पुष्कळ आवडली. तेथे आलेल्या एका कुटुंबातील महिला म्हणायच्या, ‘‘आम्हाला ही देवीच वाटते. किती गोड आहे ! देवीचे छोटे रूपच वाटते. स्तोत्रे, कविताही किती छान, हळुवार आणि एका लयीत म्हणते.’’ त्यांना यशदाचे पुष्कळ कौतुक वाटत होते. शेवटी घरी जातांना त्यांनी यशदाला देवीचे रूप म्हणून पायांना हात लावून नमस्कार केला.’
दैवी बालकांवर लहान वयातच संस्कार करणे, हे पालकांचे मोठे उत्तरदायित्व !
‘मुलांवर लहान वयातच संस्कार करणे आणि त्यांना वाढवणे हे मोठे दायित्व आहे’, हे यशदाच्या सान्निध्यात मला जाणवते. आताची लहान मुले तर पुष्कळच तल्लख आहेत. नव्या गोष्टी आत्मसात करण्याचा, शिकण्याचा मुलांचा वेग मोठ्या माणसांच्या तुलनेत पुष्कळ अधिक आहे. प्रत्यक्ष न शिकवताही आजूबाजूचे निरीक्षण करून मुले पुष्कळ काही शिकत असतात. ‘सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात आणि संत सांगतात त्यानुसार आपत्काळाच्या उंबरठ्यावर सारे जग असतांना या मुलांना सुसंस्कारीत करून घडवणे’, ही मला खरोखरीच ‘तारेवरची कसरत’ वाटते. ‘हे दायित्व पालक केवळ गुरुकृपा, धर्माचरणाचे पालन, नित्य साधना आणि उपासना, स्वतः आदर्श कृती करण्याचे प्रयत्न इत्यादींच्या आधारेच संयम ठेवून सहजरित्या सांभाळू शकतील’, असे मला वाटते.’ – सौ. इंद्राणी ऋषिकेश कुलकर्णी (यशदाची आत्या), पुणे.
यशदाचे स्वभावदोष : ‘हट्टीपणा, राग येणे, न ऐकणे, खोडकरपणा.
‘चि. यशदाचे संगोपन आणि तिच्यावर योग्य ते संस्कार परात्पर गुरुमाऊलींनीच करून घ्यावेत. आमच्यातील स्वभावदोष आणि अहं अल्प करून आमचे साधनेचे प्रयत्न आणखी वाढवावेत’, ही गुरुचरणी प्रार्थना आहे.’
– श्री. गौरीश नागेश पुराणिक (यशदाचे वडील), पुणे.
(सर्व सूत्रांचा दिनांक : २४.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |