एकनाथ खडसे यांची राजकीय संन्यासाची घोषणा !

निवडणूक न लढवण्याचा निर्णय !

एकनाथ खडसे

जळगाव – महाराष्ट्रातील राजकारणात ४ दशकांपासून कार्यरत असलेले पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी १८ नोव्हेंबरला राजकीय संन्यासाची घोषणा केली. यापुढे कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी घोषित केला, तसेच ‘पुढील निवडणूक मी पहाणार कि नाही, हे तो ईश्वरच ठरवेल’, असे म्हणत त्यांची मुलगी रोहिणी खडसे हिला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करून त्यामध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. खडसे यांनी ४ दशके जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील राजकारण गाजवले. विधीमंडळ सभागृहातील त्यांची भाषणे प्रचंड गाजली होती.