एकाच वेळी ३ संत घोषित झाल्याची सनातनच्या इतिहासातील दुर्मिळ घटना
कर्नाटकातील श्री. शांतप्पा गौडा (वय ८१ वर्षे), श्रीमती कमलम्मा (वय ८१ वर्षे) आणि सौ. शशिकला किणी (वय ७८ वर्षे) संतपदी विराजमान !
बेंगळुरू – कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सनातनचे साधक श्री. शांतप्पा गौडा (वय ८१ वर्षे) हे १२९ वे समष्टी संत, श्रीमती कमलम्मा (वय ८१ वर्षे) या १३० व्या व्यष्टी संत, तर सौ. शशिकला किणी (वय ७८ वर्षे) या १३१ व्या व्यष्टी संत म्हणून विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी साधकांना दिली.
एका अनौपचारिक सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली. या वेळी उपस्थित साधकांची भावजागृती झाली. या वेळी पू. रमानंद गौडा यांनी ‘गुरूंदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) कर्नाटकातील सर्व साधकांना केवळ आनंदच नाही, तर चैतन्यमय अशी आनंदवार्ता दिली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी गुरुदेवांच्या पावन चरणी आणि या ३ संतांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया’, असे मार्गदर्शन करतांना सांगितले.
सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.