आश्रम परिसरात असणार्‍या मंदिरांना प्रदक्षिणा घालतांना चैतन्य मिळून त्रास न्यून होत असल्याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘सप्टेंबर २०२३ ते मे २०२४ या कालावधीत मी ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रिये’साठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात होते. त्या वेळी सकाळी मला ‘थकवा, निराशा, नकारात्मक विचार येणे’, असे त्रास व्हायचे. अशा वेळी आश्रम परिसरातील मंदिरांभोवती प्रदक्षिणा घातल्यावर मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कु. स्वाती शिंदे

१. श्री सिद्धिविनायक मंदिर 

मी आश्रमात आल्यावर स्वागतकक्षातील ‘फ्लेक्स’वरील प.पू. गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डा. आठवले), तसेच प.पू. भक्तराज महाराज आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या छायाचित्रांचे दर्शन घेत असे. त्यानंतर मी आश्रमातील सिद्धिविनायकाला भावपूर्ण प्रार्थना करत मंदिराभोवती ३० ते ४५ मिनिटे प्रदक्षिणा घालत असे. प्रदक्षिणा घातल्यावर माझा त्रास न्यून होऊन उत्साह आणि सकारात्मकता वाढत असे. त्या वेळी ‘आवरण अल्प होऊन साधनेचे प्रयत्न करायला शक्ती मिळत आहे’, असे मला जाणवायचे.

२. श्री भवानीदेवी मंदिर 

मी श्री भवानीदेवीला प्रदक्षिणा घालतांना देवीकडे पहात असे. तेव्हा ‘देवी माया आणि प्रीती यांच्या दृष्टीने माझ्याकडे पहात आहे’, असे मला जाणवायचे. आमची कुलदेवी श्री भवानीदेवी आहे. त्यामुळे देवीला साधनेतील आणि कौटुंबिक सर्व अडचणी सांगून आत्मनिवेदन केल्यावर माझे मन हलके व्हायचे. ‘मी सांगत असलेले देवी ऐकत आहे आणि सर्व अडचणींचे निवारण करून तीच माझ्याकडून गुरुसेवा करून घेणार आहे’, असे मला मनातून जाणवायचे. त्या वेळी माझे त्रास न्यून होऊन चैतन्य आणि शक्ती मिळत असे. त्या वेळी प.पू. गुरुमाऊलींप्रती माझी कृतज्ञता व्यक्त व्हायची.

आम्हा साधकांचे त्रास न्यून होण्यासाठी देवाने त्या मंदिरांची स्थापना केली आहे. ‘सिद्धिविनायक आणि श्री भवानीमाता दोघेही जागृत आहेत’, हे अनुभवायला मिळाले’, याबद्दल प.पू. गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. स्वाती बाळकृष्ण शिंदे , सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३१.५.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक