Railway DRM Arrested : आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम्च्या लाचखोर विभागीय रेल्वे व्यवस्थापकाला अटक !
मुंबईतील कंत्राटदाराकडे मागितली २५ लाख रुपयांची लाचलाच देणाराही अटकेत |
विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) – मुंबईतील कंत्राटदाराकडे २५ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) विशाखापट्टणम्च्या वॉलटेअर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांना अटक केली. लाच देणार्यालाही ‘सीबीआय’ने अटक केली आहे.
सौरभ प्रसाद यांनी एका निविदेच्या संदर्भात कंत्राटदाराकडून २५ लाख रुपयांची मागणी केली होती. लाच घेण्यासाठी तो मुंबईला पोहोचला. तेथे देहलीहून आलेल्या सीबीआयच्या अधिकार्यांनी त्याला पकडले. अटकेनंतर सीबीआयच्या अधिकार्यांनी विशाखापट्टणम् येथील प्रसाद यांच्या कार्यालयाची झडती घेऊन तेथून अनेक कागदपत्रे जप्त केली. सीबीआयने अशाच एका प्रकारणात जुलैमध्येही रेल्वेच्या ५ अधिकार्यांना अटक केली होती.
संपादकीय भूमिकाअशा भ्रष्टाचार्यांची नोकरीतून तात्काळ हकालपट्टी करून त्यांची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे ! |