Bangladeshi Infiltrators Protected In Jharkhand : झारखंडमध्ये ‘झारखंड मुक्ती मोर्चा’चे सरकार बांगलादेशींना मदरशांत आश्रय देत आहे ! – जगद् प्रसाद नड्डा, भाजप अध्यक्ष
गुप्तचर यंत्रणेच्या अहवालाचा संदर्भ देत भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचा आरोप
बोकारो (झारखंड) – अलीकडेच एक गुप्तचर अहवाल आला आहे. बांगलादेशी घुसखोरांना झारखंडमधील मदरशांमध्ये आश्रय दिला जात असल्याचे त्यात म्हटले आहे. हेमंत सोरेन सरकारकडून त्यांना आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, गॅस जोडणी, रेशन कार्ड आणि भूमी उपलब्ध करून दिली जात आहे, असा आरोप भाजपचे अध्यक्ष जगद् प्रसाद नड्डा यांनी येथील निवडणूक प्रसारसभेत केला.
१. नड्डा पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांना इतर मागासवर्गियांचा (ओबीसींचा) नेता बनायचे आहे; पण राजीव गांधी फाऊंडेशन आणि राष्ट्रीय सल्लागार समिती यांत किती ओबीसी सदस्य होते ?
२. ‘इंडिया आघाडीचे नेते एक तर ‘जेल’मध्ये किंवा ‘बेल’वर (जामिनावर) आहेत. बेलवर असलेले हेमंत सोरेन लवकरच पुन्हा कारागृहात जातील. ते ५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यात आणि २३६ कोटी रुपयांच्या भूमी घोटाळ्यात सहभागी आहेत, असा आरोप नड्डा यांनी केला.
संपादकीय भूमिकाकेंद्र सरकारने देशातील सर्व मदरसे बंद करून त्यांतील मुलांना आता सामान्य शाळांमध्ये शिकवण्यास पाठवण्याचा कायदा करणे आवश्यक आहे ! |
निवड