अर्बन (शहरी) नक्षलवादापासून सावध राहून धर्माचे रक्षण करावे ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथे ‘प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट सेवा समिती’च्या वतीने १०८ श्री दत्तस्वामी याग संपन्न !
सोलापूर – हिंदु धर्म नष्ट करण्यासाठी ‘अर्बन नक्षलवाद्यांचे’ मोठे षड्यंत्र चालू आहे. हे अर्बन नक्षलवादी शिक्षण, प्रशासन, साहित्य, प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून हिंदु धर्म नष्ट करू पहात आहेत. त्यामुळे या अर्बन नक्षलवादापासून सावध राहून धर्माचे रक्षण करावे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. त्या अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथे ‘प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट सेवा समिती’च्या वतीने आयोजित ‘१०८ श्री दत्तस्वामी याग पूर्णाहुती सोहळ्या’त बोलत होत्या.
अक्कलकोट येथील भोसले मंगल कार्यालयात ‘अखंड भारतात हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत साधक, हिंदुत्वनिष्ठ आणि संत यांचे रक्षण व्हावे’, या उद्देशाने १०८ श्री दत्तस्वामी यागाचे आयोजन करण्यात आले होते. ‘प्रज्ञापुरी ज्ञानपीठा’चे पिठासन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित गुरुजी यांनी या दत्तयागाचे आयोजन केले होते.
या वेळी सद्गुरु स्वाती खाडये पुढे म्हणाल्या की, अंधश्रद्धा निर्मूलन करणारे स्वतःला ‘विवेकवादी’, असे गोंडस नाव देऊन हिंदूंच्या श्रद्धा नष्ट करत आहेत. या बुद्धीभेद करणार्या अर्बन नक्षलवादावर उपाय म्हणजे सर्वांनी धर्माचा अभ्यास करून धर्मशिक्षण घ्यावे आणि धर्म अन् श्रद्धा नष्ट करणार्यांना सडेतोड उत्तरे द्यायला हवे. यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमाला पुणे येथील सुप्रसिद्ध व्यावसायिकश्री. ज्ञानेश लोहकरे, कर्नाटक येथील श्री. विठ्ठल सौदी, श्री. सचिन साठे, ह.भ.प. महेंद्र महाराज मस्के, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वेदपाठक, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी हेही उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण
या यागासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील यजमान आणि पुरोहित असे एकूण २५० भाविक उपस्थित होते.