पिंपरी (पुणे) येथे मारहाण केल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा नोंद !
पिंपरी (पुणे) – ‘प्लॉटिंग’विषयी राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडे (‘एन्.जी.टी.’कडे) दिलेली तक्रार मागे घ्या, असे म्हणत माहिती अधिकार कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. तसेच अपहरण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी भाजपचे माजी प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव, भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांचे पती संतोषतात्या जाधव यांच्यासह ११ जणांवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना चिखलीतील जाधववाडी येथे घडली.