५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली बेंगळुरू, कर्नाटक येथील कु. नारायणी संतोष पै (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. नारायणी पै ही या पिढीतील एक आहे !

कु. नारायणी पै

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सौ. प्रतीक्षा पै

१. स्वावलंबी

‘कु. नारायणी स्वतःची सर्व कामे स्वतःच करण्याचा प्रयत्न करते.

२. शिकण्याची वृत्ती

ती नवीन गोष्टी शिकण्यासाठी पुष्कळ उत्साही असते आणि ती इतरांचे गुण स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करते.

३. कु. नारायणी तिला हवी असलेली वस्तू विचारून घेते.

४. सात्त्विकतेची आवड

कु. नारायणी दिवसभर चैतन्यवाहिनीवर नामजप अणि स्तोत्रे ऐकते. तिला मंदिरात जायला फार आवडते. तिला कुंकू लावणे आणि प्रसाद खाणे आवडते.

५. प्रेमभाव

ती आजी-आजोबांच्या पायांना तेल लावणे आणि औषध देणे, आपली खेळणी इतरांना देणे इत्यादी करते. ती स्वतःला आवडणारे गोड पदार्थ इतरांना देते.

६. करुणा

घरासमोर गाय-वासरे आली, तर ती त्यांना फळे शोधून खायला देते, तसेच ती आजोबांना ‘गायीला खायला घाला’, असे सांगते.

७. देवतांविषयी भाव

नारायणीला मंदिरात जायला आवडते. ती प्रतिदिन झोपण्यापूर्वी भ्रमणभाषवर नामजप लावण्यास सांगते. त्या वेळी ती आम्हाला सांगते, ‘‘नामजपामुळे अनिष्ट शक्ती येत नाहीत.’’ ती श्रीरामाला प्रार्थना करते, ‘बाण मारून अनिष्ट शक्तीला मार.’ नारायणीने तिच्या तिसर्‍या वाढदिवसाच्या दिवशी श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण, हनुमान, श्रीकृष्ण, परम पूज्य गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांना वाढदिवसाला येण्यासाठी प्रार्थना केली.

८. गुरूंप्रती भाव

ती ‘मी परम पूज्य डॉक्टरांसारखी डॉक्टर बनणार’, असे सांगते. नारायणी १ वर्ष ७ मासांची होती. तेव्हा आम्हाला प.पू. गुरुदेवांच्या जन्मोत्सवाला (ब्रह्मोत्सवाला) जाण्याची संधी मिळाली. तेव्हा तिला उष्णतेमुळे पुष्कळ त्रास होत होता, तरीही ती परम पूज्य गुरुदेवांना नमस्कार केल्यावरच झोपी गेली.’

– सौ. प्रतीक्षा संतोष पै (नारायणीची आई), बेंगळुरू, कर्नाटक. (२०.५.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.