मक्का आणि मदिना येथे मुसलमानेतरांना बंदी, तर मग हिंदूंच्या धार्मिक अन् पवित्र ठिकाणच्या परिसरात मुसलमानांना प्रवेश का ?
‘सौदी अरेबियात मक्का आणि मदिना या ठिकाणासभोवती एक मोठा ‘रिंग रोड’ (गोलाकार मार्ग) आहे. मक्का आणि मदिना येथे बाहेरून येणार्या सर्व मार्गांवर ‘केवळ मुसलमानांसाठी’ असे फलक (‘ओनली मुस्लीम’, असे लिहिलेले साईन बोर्ड) लावलेले आहेत, म्हणजेच या शहरांच्या हद्दीत केवळ मुसलमानच प्रवेश करू शकतात, मुसलमानेतर कुणीही प्रवेश करू शकत नाहीत. अन्य लोकांना ‘आऊटर रिंग रोड’मधून (बाहेरील गोलाकार मार्गावरून) बाहेर जावे लागते. सौदी अरेबियाच्या कायद्यानुसार मुसलमानेतर लोकांना मक्केत बंदी असून हिंदूंना सार्वजनिक ठिकाणी पूजा करण्याची बंदी आहे. हे कायदे मोडणार्या मुसलमानेतरांना कठोर शिक्षा केली जात. भारतातून पसार झालेला आणि आतंकवादाचे समर्थन करणार्या हिंदुद्वेष्ट्या झाकीर नाईकनेही व्यासपिठावरून अनेक वेळा म्हटले आहे, ‘जर तुम्ही दुसर्यांच्या धर्माला मानत नसाल, तर तुम्ही त्यांच्या प्रार्थनास्थळी जाऊ नका आणि तिथे त्यांना जाण्याची अनुमतीही दिली जाऊ देऊ नये.’
१. हिंदूंच्या सर्वधर्मसमभावाच्या घातकी भूमिकेमुळे होणारी हानी !
हिंदु मात्र सर्वधर्मसमभावाची घातक भूमिका घेऊन अहिंदूंना आणि विशेषतः मुसलमानांना मंदिरे, मठ, यात्रा, उत्सव, कुंभमेळे इत्यादी ठिकाणी प्रवेश देतात. त्यामुळे अनेक गैरप्रकार उघडकीस आले आहेत, उदा. खाद्यपदार्थामध्ये थुंकणे, महिलांना खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर बलात्कार करणे, बालाजी मंदिरातील लाडूच्या प्रसादात गायीची चरबी मिसळणे, दुकाने थाटून वस्तू आणि खेळणी यांच्या विक्रीतून आलेला पैसा जिहादी कारवायांना पुरवणे, तीर्थक्षेत्री अन् कुंभमेळ्यात स्नान करणार्या हिंदु महिलांची छायाचित्रे काढणे आणि व्हिडिओ बनवणे, मांस विकणे, मांसाहारी उपाहारगृहे थाटणे, मूर्तीभंजक असतांना मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासातून पैसे मिळवणे, ख्रिस्त्यांनी हिंदूंना फसवून धर्मांतर करणे.
२. आगामी कुंभमेळ्यात गैरहिंदूंना दुकाने लावण्यास अनुमती नाही !
आता प्रयाग (उत्तरप्रदेश) येथे होणारा आगामी कुंभमेळा आणि तीर्थक्षेत्र यांसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, त्या अगदी योग्यच आहेत. कुंभमेळा हा हिंदूंचा धार्मिक मेळावा असून त्यात गैरहिंदूंना दुकाने लावण्याची अनुमती नाकारण्यात आली आहे. याचे समर्थन काही हिंदुत्वनिष्ठ संघटना, बागेश्वरधामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री आणि अनेक संत-महात्मे यांनी केले आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संत यांचे म्हणणे अगदी योग्य आहे, ‘जे तर्क तुम्ही तुमच्या मक्का आणि मदिना यांसाठी लावता, तेच तर्क तुम्ही कुंभमेळ्यासाठीही लावावेत अन् तुम्ही हिंदु (सनातनी) नसाल, तर कुंभमेळ्यात येण्याचा तुमचा काहीही संबंध नाही.’
३. मुसलमानांच्या पवित्र ठिकाणांप्रमाणेच हिंदूंच्या धार्मिक ठिकाणीही अन्य पंथियांना बंदीच हवी !
जर मुसलमानांच्या पवित्र ठिकाणी मुसलमानेतरांना बंदी असेल, तर हिंदूंच्या पवित्र धार्मिक ठिकाणीही गैरहिंदूंना प्रवेश बंदी केली जाणे योग्यच आहे; पण त्यावरून साम्यवादी, हिंदुद्वेष्टे, हिंदुविरोधी राजकारणी, धर्मांध, मुसलमानांचे लांगूलचालन करणारे इत्यादी ‘राज्यघटना धोक्यात, व्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात, सर्वधर्मसमभाव धोक्यात’, अशा घोषणा देत गरळओक करतात. ‘गंगा जमुनी तहजीब’चा (गंगा आणि यमुना नद्यांच्या काठावरील हिंदु आणि मुसलमान यांच्या एकत्रित संस्कृतीचा) ठेका काय केवळ हिंदूंनीच घेतला नाही ! खरे तर मुसलमानांच्या धर्मात ‘गंगा जमुनी तहजीब’ किंवा ‘सर्वधर्मसमभाव’, असे काहीच नाही. मुसलमानेतर मग तो कुठल्याही धर्माचा असो, मुसलमानांसाठी तो काफीरच !
४. हिंदूंची मंदिरे, मठ आणि तीर्थक्षेत्रे येथेही गैरहिंदूंना प्रवेश बंदी हवी !
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि ‘कुंभमेळा आयोजक समिती’ यांनी गैरहिंदूंना कुंभमेळ्यात प्रवेश निषिद्ध केला आहे. या निर्णयाचे सर्व हिंदूंनी मन:पूर्वक स्वागत अन् अभिनंदन केले पाहिजे. एवढेच नव्हे, तर अशा प्रकारचे नियम हिंदूंची सर्व मंदिरे, मठ, यात्रा, तीर्थक्षेत्रे इत्यादी ठिकाणी त्वरित लागू करणे हिंदूंना अपेक्षित आहे.’ (१५.११.२०२४)
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.