देवद (पनवेल) येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर आश्रमात आलेल्या प्रतिष्ठितांनी दिलेले अभिप्राय !
१. डॉ. (सौ.) मंजुश्री रोहिदास, कोल्हापूर, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रमातील कार्य धार्मिक, आध्यात्मिक आणि शास्त्रीय पद्धतीने चालू आहे’, हे पाहून मला आश्चर्य वाटले.
आ. येथे आल्यानंतर मला साधना आणि सेवा यांविषयी समजले. ‘साधना केल्याने अंतर्बाह्य सुख-समाधान शोधणे अन् ते मिळवणे साध्य होते’, हेही माझ्या लक्षात आले.
इ. आश्रमात मला शांती आणि समाधान अनुभवायला मिळाले.’ (१०.५.२०२४)
२. श्री. राज सुधाकर मदनकर, नागपूर, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रम पाहिल्यानंतर ‘आतापर्यंत या सखोल ज्ञानाविषयी मला कुणीही का सांगितले नाही ?’, असे माझ्या मनात आले.’ (२५.१०.२०२३)
३. विद्या वी., मैसुरू, कर्नाटक.
अ. ‘आश्रम पाहिल्यावर माझ्या मनातील अनेक शंकांचे निरसन झाले.
आ. ‘चांगली स्पंदने कशी निर्माण होतील ? आणि त्यांचा लाभ कुटुंबियांनाही कसा होईल ?’, याची मला जाणीव झाली.’ (२४.८.२०२४)
आश्रमातील सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून दिलेले अभिप्राय !
१. विद्या वी., मैसुरू, कर्नाटक
‘हे प्रदर्शन पुष्कळ चांगले आहे. असे प्रदर्शन मी आयुष्यात प्रथमच पहात आहे.’ (२४.८.२०२४)
२. श्री. राज सुधाकर मदनकर, नागपूर, महाराष्ट्र
‘आपल्या सभोवती घडत असलेल्या अशा अनेक गोष्टी आपल्या नजरेस येत असतात; परंतु ‘सूक्ष्म स्तरावर नेमके काय घडते ?’, याबद्दल मिळालेली ही माहिती माझ्या कल्पनेच्या आणि समजण्याच्या पलीकडील आहे.’ (२५.१०.२०२३)
|