भगवंताची भक्तीच तारेल भीषण आपत्काळी ।

‘सध्या सर्वसाधारण जनता ‘नामस्मरण’ म्हणजे ‘साधना’ करण्यास विसरली आहे. त्यामुळे चालू झालेल्या घनघोर आपत्काळात लोक दुःखीकष्टी होऊन केवळ ‘काय करू ? कसे करू ?’ हा अष्टाक्षरी जप करत आहेत. ‘कलियुगातील आपत्कालीन संकटातून वाचण्यासाठी ‘साधना करणे’ हाच एकमेव उपाय आहे’, असे अनेक संत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे. ते माझ्यासारख्या सहस्रो साधकांकडून ‘साधना’ करून घेऊन आपत्काळातही आनंद देत आहेत.

पू. शिवाजी वटकर

कलियुगी जन दुःखीकष्टी जाहले ।
‘काय करू? कसे करू ?’ अष्टाक्षरी जपू लागले ।। १ ।।

कोरोनासम महामारीने भयभीत झाले ।
भगवंताचे नाम घेण्या ते विसरले ।। २ ।।

स्वार्थाने नि त्रासाने (टीप १) जन ग्रासले ।
शारीरिक नि मानसिक उपचारात अडकले ।। ३ ।।

आपत्काळाला सामोरे जाण्यास घाबरले ।
भगवंतावरी भाव नि श्रद्धा ठेवण्या ते विसरले ।। ४ ।।

भगवंताची भक्तीच तारेल भीषण आपत्काळी ।
‘साधना’ करवून घ्यावी, हीच प्रार्थना गुरुचरणी (टीप २) ।। ५ ।।

टीप १ – शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास

टीप २ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.११.२०२०)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक