संपादकीय : सज्जाद नोमानींचा जिहाद !
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान २० नोव्हेंबर या दिवशी आहे. या निवडणुकांमध्ये स्वत:च्या पक्षाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पक्ष विविध प्रकारे प्रयत्न करत आहेत. यामध्ये काही दिवसांपूर्वीच राज्यातील ‘ऑल इंडिया उलेमा बोर्ड’ या मौलानांच्या संघटनेने एकूण १७ भयावह मागण्या काँग्रेसकडे केल्या आणि काँग्रेसने त्या मान्य केल्याच्या बातमीने खळबळ उडवून दिली. त्यामध्ये वर्ष २०१२ पासून झालेल्या दंगलींमध्ये मुसलमानांविरुद्ध नोंदवलेले गुन्हे मागे घ्यावेत, राज्यातील मशिदींच्या इमामांना सरकारच्या वतीने प्रत्येक महिन्याला १५ सहस्र रुपये द्यावेत, निवडणुकीत ५० मुसलमान उमेदवारांना तिकिटे द्यावीत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी, मौलानांना शासकीय समितीवर घ्यावे, अशा काही मागण्यांचा समावेश आहे. अशा मागण्या आहेत की, राज्यात जणू इस्लामचे राज्य आहे किंवा पाकिस्तानातील निवडणुकीतील या मागण्या आहेत. त्यात भरीस भर म्हणून या बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी ‘महाराष्ट्रात त्यांचा (भाजपचा) पराभव झाला, तर देहलीमधील त्यांचे सरकार अधिक काळ टिकू शकणार नाही. त्यामुळे आमच्या निशाण्यावर केवळ महाराष्ट्राचे सरकार नाही, तर देहलीही आहे’, असे विधान केले आहे.
धाडस होतेच कसे ?
भारतासारख्या बहुसंख्य हिंदू असलेल्या आणि राज्यघटनेनुसार ‘सेक्युलर’ (निधर्मी) म्हणवणार्या देशात उलेमा बोर्ड अशा मागण्या कशा करू शकते ? नोमानी असे कसे बोलू शकतात ? त्यांचे एवढे धाडस होतेच कसे ? असे सामान्य माणसाला वाटते. मुसलमानांचा आवडता पक्ष ज्याला दुसर्या शब्दांमध्ये ‘दुसरी मुस्लिम लीग’ म्हणतात, तो काँग्रेस पक्ष सत्तेवर येण्याचे स्वप्न मुसलमान आणि नोमानी यांच्यासारखे नेते पहात आहेत. हा मुसलमानधार्जिणा काँग्रेस पक्ष दीर्घकाळ, म्हणजे ६ दशके देशात सत्तेवर होता. या कार्यकाळात मुसलमानांसाठी त्याने काय केले नाही ? आणि हिंदूंना कशाकशापासून वंचित ठेवले ? त्याची सूची पुष्कळ मोठी आहे.
भारतभरातील लोकांना त्रासदायक ठरलेला ‘वक्फ बोर्ड कायदा’ हा याच काँग्रेसची देण आहे. जगात कुठेही मुसलमानांसाठी एवढ्या सुविधा दिल्या जात नाहीत, तेवढ्या काँग्रेसने दिल्या आहेत. त्यामुळे आज राष्ट्राची, पर्यायाने बहुसंख्य हिंदूंची सुरक्षा पणाला लावली आहे. पाकच्या क्षेत्रफळाहून अधिक क्षेत्रफळाची भूमी सध्या वक्फ बोर्डाकडे आहे आणि वक्फचा हा भस्मासुर हिंदू अन् सामान्य जनता यांची केवळ भूमीच नव्हे, तर गावेच्या गावे, मंदिरे, सरकारी जागाच गिळंकृत करू पहात आहे. हिंदूंची मंदिरे पाडून त्या ठिकाणी मशिदी उभारण्यात आल्या आणि भविष्यात हिंदूंना हे लक्षात आल्यावर त्यांना ती मंदिरे पुन्हा मिळवणे शक्य होऊ नये म्हणून ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ हा कायदा लागू केला, म्हणजे मुसलमानांच्या पूर्वजांनी छळा-बळाने, कपटाने हिंदूंची मंदिरे तोडली, भूमी लाटल्या, ती पुन्हा हिंदूंच्या पुढच्या कुठल्याच पिढ्यांना मिळवता येणार नाही. हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करण्यासाठी कायदा; पण मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यासाठी स्वतंत्र बोर्ड ! त्या व्यतिरिक्त बुरखा बंदी वा हिजाब बंदी करू नये, यासाठी अधूनमधून दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण केली जाते ती वेगळी, याखेरीज दिवसातून ५ वेळा कर्णकर्कश स्वरात ध्वनीक्षेपकावरून दिली जाणारी बांग हिंदूंनी ऐकलीच पाहिजे, हा अलिखित नियम ! हे नाही झाले, तर ‘इस्लाम खतरेमें है ।’ ही भीती घालायला मुसलमान मोकळे !
‘तिसर्या’चा लाभ होण्याची शक्यता !
नोमानी यांच्या मुसलमानांना चिथावणी देणार्या भाषणांच्या ‘क्लिप्स’ मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. त्यांनी त्यांच्यासाठी आदराचे स्थान असलेले शरद पवार, काँग्रेसचे नाना पटोले आणि ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांचा गौरव (?) केला आहे. शरद पवार यांना भेटून त्यांना मुसलमानांच्या हितासाठी काम करण्याचे वदवून घेतल्याचे म्हटले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि उघडपणे मुसलमानांचे नेते बोलत असतील, तर तो ‘व्होट जिहाद’ नाही, तर कोणता जिहाद आहे ? ‘व्होट जिहाद’चे सूत्र सत्ताधार्यांकडून उपस्थित केल्यावर महाराष्ट्राचे ४ वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले शरद पवार म्हणतात, ‘‘भाजपला पुण्यात एक विशिष्ट समाज मतदान करतो, त्याला ‘जिहाद’ म्हणणार का ?’’ येथे विशिष्ट समाज, म्हणजे स्पष्टपणे सांगायचे तर ब्राह्मण समाजाकडेच पवार यांचा रोख दिसतो. ब्राह्मण समाज आणि मुसलमान यांच्यात तुलना होऊ शकते का ? तर मुळीच नाही. हे स्वत: पवार यांनाही ठाऊक आहे. तरीही तशी तुलना करण्याचा प्रयत्न करून ते स्वत: करत असलेल्या लांगूलचालनाकडून दुसरीकडे लक्ष भरकटवत आहेत. जे काँग्रेसने केले तेच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही केले आहे. काँग्रेसने मुसलमानांचे अतीलांगूलचालन करून हिंदूंवर अन्याय केला, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ब्राह्मणद्वेष चालू करून हिंदूंमध्येच भांडणे लावून दिली. त्यामुळे दोन्ही पक्ष तसे एकाच माळेचे मणी आहेत. भाजपचे किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वीच मुसलमानांच्या ४०० हून अधिक अराजकीय संस्थांविषयी पोलिसांत तक्रार दिली आहे. या मुसलमानांच्या संस्था राज्याच्या निवडणुकीत मुसलमानांचे १०० टक्के मतदान होण्यासाठी, म्हणजेच ‘व्होट जिहाद’साठी प्रयत्नशील आहेत. उलेमा बोर्डानेही काँग्रेसकडे महाविकास आघाडीचा प्रचार करण्यासाठी यंत्रणा उभारण्यासाठी आर्थिक आणि अन्य साहाय्य मागितले आहे. यातून मुसलमानांची सिद्धता किती झाली आहे ? याचा अंदाज बहुसंख्यांक हिंदूंनी घेतला पाहिजे. सध्या तिसरी आघाडी आहे, तिलाही मुसलमानांचे साहाय्य हवे आहे आणि आरक्षणाचे आंदोलन उभारणार्यांनाही मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांचे साहाय्य हवे आहे. किती विलक्षण आणि गोंधळाची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे ? आपल्याकडे एक म्हण आहे, ‘दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ !’ ही म्हण महाराष्ट्रात लागू होणार कि काय, अशी भीती आहे. तिसर्याला लाभ झाला, तर तो तिसरा उर्वरितांना गिळणारच आहे आणि भांडणार्या दोघांचाही काटा काढणार आहे; मात्र भांडणार्यांना त्याचे काही देणेघेणे नाही. ही चांगली संधी आहे, हे धर्मांधांनी जाणले आहे. त्यामुळेच त्यांचे निवडणूक मूल्य वाढले आहे. राजकीय पक्षांनी त्यांचा लाभ करून घेण्याऐवजी तेच त्यांच्या इशार्यावर नाचत आहेत आणि त्यांच्या विचारसरणीचे पक्ष सत्तेवर आल्यावर ते आणखी नाचवणार आहेत. याविरुद्ध सत्ताधार्यांनी धर्मयुद्धाची हाक दिली आहे. सत्य आणि असत्य यांमध्ये धर्मयुद्ध असले, तरी सत्य काय आणि असत्य काय हे कोण ठरवणार ? हिंदु मतदार नेहमीप्रमाणे झोपून राहिले, ‘सेक्युलॅरिझम’च्या धुंदीत राहिले, तर या निवडणुकीत मुसलमान मात्र सरकार ठरवणार, हेच सत्य आहे. तेव्हा योगी आदित्यनाथ यांच्या भाषेत ‘बटेंगे तो कटेंगे’ याही पुढे ‘सोयेंगे तो सब कुछ गवाएंगे ।’ याची खूणगाठ बहुसंख्यांकांनी मनाशी पक्की करावी !
धर्मांधांच्या ‘व्होट जिहाद’ला उत्तर देण्यासाठी हिंदू स्वाभिमान जागृत करणार कि नाही ? |