रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सीताराम अनंत आग्रे (वय ६९ वर्षे) यांनी त्यांच्या साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !
‘सप्टेंबर १९९६ मध्ये मी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. सनातन संस्थेच्या स्थापनेचा उद्देश कळल्यावर ‘यातूनच मला मार्ग मिळेल’, असा विश्वास माझ्या मनात निर्माण झाला.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रथम दर्शन
मला ३०.१२.१९९६ या दिवशी लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रथम दर्शन झाले. तेव्हा मला अत्यानंद होऊन माझे मन प्रफुल्लित झाले.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जाहीर सभेनिमित्त प्रथमच सेवा करूनही आनंद मिळणे
जानेवारी १९९७ मध्ये मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या देवरुख (रत्नागिरी) येथे होणार्या पहिल्या जाहीर सभेच्या निमित्ताने सेवेला जायला मिळाले. त्या वेळी मी प्रथमच सेवा करणार होतो. तेथे साधकांच्या सहकार्यामुळे मला देहभान विसरून सेवा करता आली आणि सेवेच्या निमित्ताने माझी साधकांशी ओळख झाली. त्यामुळे मला आनंद मिळाला.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत असतांना ‘ते सेवा करणार्या साधकांची किती काळजी घेतात !’, हे अनुभवणे
वर्ष १९९८ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांची लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील पहिली जाहीर सभा झाली. तेव्हा मला परात्पर गुरु डॉक्टरांचा सहवास लाभला. नंतर मला परात्पर गुरु डॉक्टरांसह पावस, गणपतीपुळे आणि रत्नागिरी येथे जाण्याची संधी मिळाली. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर ‘सेवा करणार्या साधकांची किती काळजी घेतात !’, हे मी अनुभवले.
४. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या बांधकामाच्या सेवेसाठी गोव्याला येणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्यावर थकवा दूर होऊन उत्साह वाटणे
मे २००४ मध्ये मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या बांधकामाच्या सेवेसाठी फोंडा (गोवा) येथील सुखसागर सेवाकेंद्रात आलो. पहिल्याच दिवशी मला परात्पर गुरु डॉक्टरांचे लांबून दर्शन झाले. मला आश्रमातील चैतन्यही मिळाले. मी बांधकामाची सेवा करून सेवाकेंद्रात परत येत असे. तेव्हा मी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचत असतांना मला परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन व्हायचे आणि दिवसभरात मला आलेला थकवा दूर होऊन मला उत्साह वाटत असे.
५. मी रामनाथीला येण्यापूर्वी पायाच्या त्रासामुळे मला अधिक वेळ उभे रहाता येत नव्हते. मी आश्रमात आल्यावर सेवा करू लागलो आणि आश्रमातील चैतन्याने माझ्या पायाचा त्रास बरा झाला.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मुलीचा विवाह होणे आणि तिच्या विवाहाच्या निमित्ताने परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार करण्याची संधी मिळणे
वर्ष २००४ मध्ये श्री गणेशचतुर्थीनिमित्त घरी जाण्यापूर्वी मी माझी मुलगी नंदिनी (आताच्या सौ. आर्या आदित्य कासकर) हिला भेटायला गेलो होतो. तेव्हा नंदिनी दायित्व घेऊन सेवा करत होती. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही मुलीच्या लग्नाची काळजी करू नका. तिचे लग्न व्यवस्थित होईल.’’ त्याप्रमाणे वर्ष २०११ मध्ये नंदिनीचे लग्न झाले. तेव्हा मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार करण्याची संधी मिळाली.
७. प्रकृती ठीक नसतांना सेवा करत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘प्रकृती सांभाळून सेवा करा’, असे सांगितल्यावर दुखणे न्यून होणे
आश्रमाच्या दुसर्या माळ्यावरील बांधकाम चालू असतांना माझी प्रकृती बरी नव्हती, तरीही मी सेवा करत होतो. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर तिथे आले आणि मला म्हणाले, ‘‘अजून पुढे पुष्कळ सेवा करायची आहे. प्रकृती सांभाळून सेवा करा.’’ तेव्हा माझे दुखणे न्यून झाले; मात्र ‘त्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांना यावे लागले’, याचे मला वाईट वाटले.
८. सुखसागर सेवाकेंद्रातून रामनाथी आश्रमात जातांना परात्पर गुरु डॉक्टरांनी तेथील सर्व भिंतींना स्पर्श करून नमस्कार केला. तेव्हा आम्हा सर्व साधकांचा भाव जागृत झाला.
९. देवद, पनवेल येथील आश्रमाचे बांधकाम चालू असतांना देखभालीसाठी देवद येथे जाणे
वर्ष २०११ मध्ये मला देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सेवेला जायला सांगितले. देवद आश्रमात सेवेला जाण्याआधी मी परात्पर गुरु डॉक्टरांना भेटायला गेलो. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘आश्रमाचे बांधकाम चालू आहे. तुम्ही देखभाल करण्याची सेवा करा.’
– श्री. सीताराम अनंत आग्रे (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |