भविष्य काळातील नेतृत्वात भारताचे महत्त्वाचे स्थान असेल ! – Former British PM Elizabeth Truss

ब्रिटनच्या माजी पंतप्रधान एलिझाबेथ ट्रस यांचे विधान

‘हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट’मध्ये बोलताना ब्रिटनच्या माजी पंतप्रधान एलिझाबेथ ट्रस (उजवीकडे)

लंडन (ब्रिटन) – पाश्‍चात्त्य देश गंभीर संकटात आहेत आणि भारताने ब्रिटीश अर्थव्यवस्थेला मागे टाकले आहे. भारतात अनेक महत्त्वपूर्ण आर्थिक धोरणे आणि सुधारणा झाल्या आहेत. भविष्य काळातील नेतृत्वात त्याचे महत्त्वाचे स्थान असेल, असे ब्रिटनच्या माजी पंतप्रधान एलिझाबेथ ट्रस यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट’मध्ये म्हटले आहे.

ट्रस पुढे म्हणाल्या की, तंत्रज्ञान आणि कृषी यांसारख्या क्षेत्रांत भारत अन् ब्रिटन यांच्यात फार काही साध्य करता येऊ शकते. भारत आता जगातील सर्वांत मोठी लोकसंख्या आणि दीर्घकाळापासून लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणारा देश आहे. भविष्य काळातील नेतृत्वात त्याचे महत्त्वाचे स्थान असेल, जे फार उत्साहवर्धक आहे. चीनचा वाढता धोका लक्षात घेता, ‘क्वाड’ संघटनेत भारताचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

ट्रस यांनी ब्रिटीश अर्थव्यवस्थेसंदर्भात म्हटले की, ब्रिटीश अर्थव्यवस्था लवकरात लवकर सावरेल, असे मला वाटत नाही. ब्रिटनमधील शक्तीशाली नोकरशाहीवर नियंत्रण आणल्याखेरीज सर्व काही सुरळीत होणार नाही.