Iran Supreme Leader Successor Elected : इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी त्याच्या मुलाला केले उत्तराधिकारी !

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (उजवीकडे) व त्यांचा उत्तराधिकारी सरा मुलगा मोजतबा खामेनी (डावीकडे)

तेहरान (इराण) – इराणचे ८५ वर्षीय सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी सध्या आजारी आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पदाचे दायित्व त्यांचा दुसरा मुलगा मोजतबा खामेनी यांच्याकडे सोपवले आहे; मात्र याविषयी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

इराणच्या ‘एक्सपर्ट असेंब्ली’ने २६ सप्टेंबर या दिवशी नवीन सर्वोच्च नेत्याची निवड केली होती. खामेनी यांनी स्वतः विधानसभेच्या ६० सदस्यांना बोलावून उत्तराधिकारी निवडण्यास गुप्तपणे सांगितले होते. मोजतबा खामेनी यांच्या नावावर विधानसभेने एकमताने सहमती दर्शवली.