DRDO Hypersonic Missile Test : भारताच्या स्वदेशी हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

(हायपरसॉनिक म्हणजे ध्वनीच्या ५ पटटींनी अधिक वेग असणारे)

भुवनेश्‍वर (ओडिशा) – भारताच्या ‘डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डी.आर्.डी.ओ.) विभागाने १६ नोव्हेंबरच्या रात्री लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक  क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.


संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी १७ नोव्हेंबरला सकाळी एक्सवर पोस्ट करत  सांगितले की, या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारत अशा सैनिकी तंत्रज्ञान असलेल्या निवडक देशांच्या गटात सहभागी झाला आहे. हे मोठे यश असून देशासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे.

या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा पल्ला १ सहस्र ५०० किलोमीटरपेक्षा अधिक आहे. या क्षेपणास्त्राद्वारे शत्रूवर हवा, पाणी आणि भूमी या तिन्ही ठिकाणांहून आक्रमण केले जाऊ शकते. हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वेग आंतरखंडीय क्षेपणास्त्रांपेक्षा अल्प आहे; परंतु हायपरसॉनिक क्षेपणास्त्रेे लक्ष्याच्या दिशेने जात असतांना मध्यभागी पोचल्यानंतरही दिशा पालटू शकतात. यामुळे ते संरक्षण यंत्रणा, म्हणजेच रडारला चकमा देऊ शकतात.