स्वतःसमोर ध्येय ठेवणे अधिक चांगले !
स्वतःसमोर ज्याने एखादे ध्येय ठेवले आहे, असा माणूस जर सहस्र चुका करतो, तर काहीच ध्येय नसलेला माणूस ५० सहस्र चुका करील; म्हणून स्वतःसमोर कोणते ना कोणते ध्येय ठेवणे, हे अधिक चांगले आहे. तुम्ही वस्तूतः कोण आहात ? याचे तुम्हाला ज्ञान असते, तर किती चांगले झाले असते ? तुम्ही आत्मा आहात. तुम्ही ईश्वर आहात. जर मी तुम्हाला माणूस म्हणेन, तर ती तुमची निंदाच होईल. तुम्ही जन्माला आलाच आहात, तेव्हा जगात काही तरी खूण सोडून जा किंवा महत्त्वाचे कार्य करून जा.
– स्वामी विवेकानंद