सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सव’ सोहळ्याच्या संदर्भात केलेल्या वैज्ञानिक संशोधनाविषयी सौ. मधुरा कर्वे यांनी विचारलेले बुद्धीअगम्य प्रश्न आणि श्री. राम होनप यांनी सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे दिलेली त्यांची उत्तरे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी परिधान केलेले सर्व वस्त्रालंकार चैतन्याने भारित करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्या परिसरातील श्री सिद्धिविनायक मंदिरात ठेवण्यात आले होते. या वस्त्रालंकारांना मंदिरात आध्यात्मिक स्तरावरील उपायांना ठेवण्यापूर्वी, मंदिरात १० ते १२ घंटे उपायांसाठी ठेवल्यानंतर आणि ब्रह्मोत्सवानंतर (म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ब्रह्मोत्सवात वस्त्रालंकार परिधान केल्यानंतर) या टप्प्यांप्रमाणे चाचण्या करण्यात आल्या. याविषयी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. मधुरा कर्वे यांच्या मनात निर्माण झालेले काही प्रश्न आणि देवाच्या कृपेमुळे सूक्ष्मातून प्राप्त झालेल्या ज्ञानाद्वारे मी दिलेली त्यांची उत्तरे पुढे दिली आहेत.  (भाग ५)

याच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/852900.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रश्न क्र. १२

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हातांत परिधान केलेल्या अलंकारांपेक्षा त्यांनी चरणांवर परिधान केलेल्या अलंकारांमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक आहे. यामागील कारण काय ?

१२ अ. उत्तर 

१. संतांच्या हातांपेक्षा त्यांच्या चरणांतून वातावरणात चैतन्याचे प्रक्षेपण अधिक होत असते.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातांतून पृथ्वी आणि त्यावरील सूक्ष्म लोकांत चैतन्याचे प्रक्षेपण होते अन् त्यांच्या चरणांतून पाताळांतील वाईट शक्तींकडे चैतन्याचे प्रक्षेपण होत असते.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चरणांतून प्रक्षेपित होत असलेल्या चैतन्यामुळे पाताळातील वाईट शक्तींचा जोर न्यून होतो. त्यामुळे पृथ्वीवर सनातन धर्माच्या रक्षणाचे कार्य होते, तसेच वाईट शक्तींचे कार्य नियंत्रित होते.

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या हातांतून वातावरणात एकसारखे चैतन्याचे प्रक्षेपण होत असते; याउलट त्यांच्या चरणांद्वारे सप्तपाताळांतील वाईट शक्तींवर चैतन्याचा मारा अधिकाधिक होत असतो; कारण पृथ्वीवर वाईट शक्तींचे अधर्माचे कार्य दिवसेंदिवस वाढत आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चरणांतून चैतन्याचे पुष्कळ प्रक्षेपण होत असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या चरणांवरील अलंकारांवर झाला; म्हणून त्यांनी हातांत परिधान केलेल्या अलंकारांपेक्षा चरणांवर परिधान केलेल्या अलंकारांमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक आढळून आली.

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चरणांद्वारे प्रक्षेपित होत असलेल्या चैतन्यामुळे सप्तपाताळांतील वाईट शक्तींच्या पृथ्वीवरील अधर्माच्या कार्यावर वचक रहातो. त्यामुळे त्यांच्या चरणांना ‘पाताळ नियंत्रक’, असे म्हटले आहे.

‘ब्रह्मोत्सव’ सोहळ्यातील टाळ पथकाचे एक दृश्य

प्रश्न क्र. १३  

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या डाव्या बाजूच्या अलंकारांपेक्षा उजव्या बाजूच्या अलंकारांमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक असण्यामागे कारण काय ?

१३ अ. उत्तर

१३ अ १. सर्वसाधारण व्यक्तीतील चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि सुषुम्ना नाडी यांचे कार्य : व्यक्तीतील चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांमुळे तिच्या शरिरातील तापमान नियंत्रित होते.

१३ अ २. चंद्रनाडीत ‘चंद्रहंसी’ नावाची शक्ती असते.

१३ अ २ अ. ‘चंद्रहंसी’ : ‘चंद्र’ या शब्दाचा अर्थ ‘शीतल’, असा आहे. ‘हं’चा अर्थ ‘मोठे’ आणि ‘सी’चा अर्थ ‘लहान’, असा आहे. व्यक्तीच्या शरिरात निर्माण होणार्‍या लहान-मोठ्या शीतलहरींचे नियंत्रण करणारी शक्ती, म्हणजे ‘चंद्रहंसी’ होय. तिलाच ‘शीतली’, असेही म्हणतात. ‘चंद्रहंसी’ या शक्तीची निर्मिती ‘कामयानी’ या मूलशक्तीपासून झाली आहे.

१३ अ २ आ. ‘कामयानी’ : ‘काम’ हा शब्द व्यक्तीच्या शरिराशी संबंधित आहे आणि ‘यानी’ हा शब्द ‘निर्वहन करणारी’ किंवा ‘प्रवाही’, असा आहे. व्यक्तीच्या शरिरातील भिन्न भिन्न ऊर्जाप्रवाह नियंत्रित करणारी शक्ती, म्हणजे ‘कामयानी’ होय.

१३ अ २ आ १. ‘कामयानी’ची उत्पत्ती : ‘कामयानी’ या शक्तीची उत्पत्ती भगवान शिवाच्या तिसर्‍या नेत्रातून झालेली आहे. ‘कामयानी’ या शक्तीची लघुशक्ती, म्हणजे ‘चंद्रहंसी’ होय.

१३ अ २ आ २. शरिरातील ‘कामयानीशक्ती’चे कार्य : व्यक्तीचे अंतर्मन, बहिर्मन, तसेच शरिरातील रक्तप्रवाह, वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष अन् विविध ऊर्जाप्रवाह नियंत्रित करण्याचे कार्य ‘कामयानीशक्ती’ करत असते.

१३ अ ३. सूर्यनाडी : या नाडीत ‘सूर्यायू’ नावाची शक्ती असते. यात ‘सूर्य’ म्हणजे ‘तेज’ आणि ‘अयू’ हा शब्द ‘अंशतः’ या अर्थाने आहे. सूर्याच्या अंशशक्तीला ‘सूर्यायू’, असे म्हणतात. शरिरातील काही नाड्यांमधून प्रवाहित होणारी ऊर्जा ही सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि प्रभावी असते. त्यामुळे तिला ‘सूर्यनाडी’, असे संबोधन आहे.

१३ अ ४. चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांचा परस्परांशी असलेला संबंध : व्यक्तीच्या मूलाधारचक्रातून शरिराच्या कार्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा निर्माण होते आणि ती विविध नाड्यांद्वारे प्रवाहित होत असते. त्यामुळे शरिराचे तापमान वाढते. हे तापमान सहन करणे कठीण असते. त्यामुळे मूलाधारचक्रातून चंद्रनाडीद्वारे शीतल प्रवाह शरिरात निर्माण होतो; परिणामी व्यक्तीच्या शरिराचे तापमान नियंत्रित होते.

कुठल्याही भौगोलिक परिस्थितीत चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांमुळे व्यक्तीच्या शरिरात विशिष्ट तापमान निर्माण होते अन् ते टिकून रहाते; परिणामी त्या त्या परिस्थितीत व्यक्तीला जिवंत रहाणे सुलभ जाते, उदा. थंड प्रदेशातील थंड हवामानात आणि अतीउष्ण प्रदेशातील हवामानात व्यक्ती जिवंत राहू शकते.

१३ अ ५. सुषुम्ना नाडी : व्यक्तीच्या शरिरातील चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांच्या कार्यामुळे शरिराचे तापमान अन् विविध कार्ये सुरळीतपणे चालू रहातात. या दोन्ही नाड्यांचा उत्तम समन्वय व्यक्तीची सुष्मना नाडी करते. सुषुम्ना नाडीच्या मध्यस्थीमुळे चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांच्यातील कार्य संतुलित अन् शरिरासाठी लाभदायक ठरते. त्यामुळे सुषुम्ना नाडीला ‘सेतूनाडी’, ‘मध्यनाडी’, ‘मध्य-ऊर्जाप्रवाह’ किंवा ‘संयुक्ता’, असे म्हटले आहे.

वरील सर्व विश्लेषण हे सर्वसामान्य व्यक्तींच्या संदर्भातील आहे.

श्री. राम होनप

१३ अ ६. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि सुषुम्ना नाडी यांचे कार्य 

१३ अ ६ अ. सुषुम्नानाडी : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे ज्ञानासंबंधीचे कार्य सुषुम्नानाडीद्वारे चालते. त्यामुळे त्या नाडीला ‘ब्रह्मनाडी’, असे म्हटले आहे. या नाडीद्वारे त्यांना काळानुरूप राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांविषयी सूक्ष्मातून ज्ञान मिळते. त्यामुळे त्या नाडीला ‘वैश्विक नाडी’, असेही म्हटले आहे.

१३ अ ६ आ. सूर्यनाडी : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या सूर्यनाडीद्वारे समाजाच्या कल्याणासाठी वातावरणात तारक आणि मारक चैतन्याचे प्रक्षेपण सातत्याने होत असते.

१३ अ ६ इ. चंद्रनाडी : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या शरिरात सूर्यनाडीद्वारे समाजाच्या कल्याणासाठी प्रचंड ईश्वरी ऊर्जा प्रस्फुटित होत असते. त्यामुळे त्यांच्या शरिराचे तापमान वाढते. ही ऊर्जा नियंत्रित करण्याचे कार्य त्यांची चंद्रनाडी करत असते.

१३ अ ७. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या डाव्या बाजूच्या अलंकारांपेक्षा त्यांच्या उजव्या बाजूच्या अलंकारांमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक असण्यामागील कारण : शरिरात डाव्या बाजूला चंद्रनाडी आणि उजव्या बाजूला सूर्यनाडी कार्य करत असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या शरिरातील डाव्या बाजूला चंद्रनाडीद्वारे चैतन्य सौम्य आणि शीतल स्वरूपात कार्य करते, तर उजव्या बाजूला सूर्यनाडीद्वारे चैतन्य प्रखर आणि तीव्र स्वरूपात कार्य करत असते; परिणामी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या डाव्या बाजूच्या अलंकारांपेक्षा त्यांच्या उजव्या बाजूच्या अलंकारांमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक आढळून आली.

प्रश्न क्र. १४

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अन्य वस्त्रालंकारांच्या तुलनेत सोवळे, मुकुट आणि श्रीवत्स पदक, तसेच पायांतील मोजड्या (कापडी बूट) यांमध्ये सर्वाधिक (म्हणजे १ लक्ष मीटरपेक्षाही अधिक) सकारात्मक ऊर्जा आहे. याचे कारण काय ?

१४ अ. उत्तर 

१४ अ १. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे सोवळे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या मस्तकापासून कमरेपर्यंतचा भाग सगुण तत्त्वाशी संबंधित, तर कमरेपासून चरणांपर्यंतचा भाग निर्गुण तत्त्वाशी संबंधित आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ब्रह्मोत्सवात सोवळे परिधान केल्यावर त्यांच्या शरिरातील निर्गुण तत्त्व सोवळ्यात घनीभूत झाले.

१४ अ २. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा मुकुट – परात्पर गुरु डॉक्टरांचे सहस्रारचक्र जागृत आणि प्रकाशमान अवस्थेत असणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची साधना आणि अवतारत्व यांमुळे त्यांचे सहस्रारचक्र जागृत अवस्थेत असून ते प्रकाशमान आहे. त्या प्रकाशात वैश्विक ऊर्जा अंशतः सामावलेली आहे. ही ऊर्जा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ब्रह्मोत्सवात परिधान केलेल्या मुकुटात घनीभूत झाली.

१४ अ ३. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे श्रीवत्स पदक : गळ्यात श्रीवत्स पदक परिधान केल्यावर त्याचे स्थान अनाहतचक्रापर्यंत येते. तेथे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची आत्मिक आणि प्राणऊर्जा आहे. ही ऊर्जा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ब्रह्मोत्सवात परिधान केलेल्या श्रीवत्स पदकात घनीभूत झाली.

१४ अ ४. पायांतील मोजड्या (कापडी बूट) : शरिराच्या अन्य अवयवांच्या तुलनेत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चरणांतून वातावरणात चैतन्याचे प्रक्षेपण कार्यानुरूप अधिकाधिक होत असते; परिणामी त्यांच्या चरणांतील मोजड्यांत सकारात्मक ऊर्जा पुष्कळ आढळून आली.’   (समाप्त)

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.८.२०२३)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.