नवी मुंबईत वाढत्या फेरीवाल्यांमुळे जनता त्रस्त !
नवी मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या कामांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे शेकडो कर्मचारी कर्तव्यावर आहेत. याचाच गैरफायदा घेत शहरातील रस्ते आणि पदपथ हे फेरीवाल्यांनी बळकावले आहेत. यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.
१. सीबीडी, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, एपीएम्सी, कोपरखैरणे, वाशी, ऐरोली, घणसोली, दिघा या विभागातील मुख्य रस्ते आणि काही अंतर्गत रस्त्यांवर फेरीवाल्यांची संख्या अधिक आहे.
२. नवी मुंबई बाहेरील गोवंडी, मानखुर्द आदी परिसरात परप्रांतीय फेरीवाले पुष्कळ आहेत. त्यांच्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. पदपथ चालण्यासाठी उपलब्ध नसल्याने नागरिकांना रस्त्यावरून जावे लागत आहे.
संपादकीय भूमिका :निवडणुकीची कामे असतांनाही फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्याचे नियोजन महापालिकेने का केले नाही ? |