पुणे ‘पोर्शे’कार प्रकरणातील २ जणांवर आरोपपत्र प्रविष्ट !
रक्ताच्या नमुन्यात पालट करून पुरावा नष्ट केल्याचा आरोप !
पुणे – कल्याणीनगर ‘पोर्शे’कार अपघातातील आदित्य सूद आणि आशिष मित्तल या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात २४२ पानी आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. त्यात अपघातातील अल्पवयीन मुलांच्या रक्ताच्या नमुन्यात पालट करून पुरावा नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आरोपपत्रात १७ साक्षीदारांचे जबाब नोंदवून जोडण्यात आले आहेत. येरवड्यातील कल्याणीनगर भागात १९ मे या दिवशी भरधाव ‘पोर्शे’कारच्या धडकेमध्ये दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता.