वृद्धावस्थेच्या कठीण काळाला तोंड देण्यासाठी तारुण्यावस्थेतच साधना चालू करा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मनुष्यासाठी त्यांच्या जन्मामध्ये जन्म ते प्रौढावस्था हा पुष्कळ मोठा कालावधी असतो. या कालावधीत कसे वागावे, कसे रहावे, हे शिकता येते. हे शिकण्यासाठी अनेक पर्यायही उपलब्ध असतात. त्यानंतर वृद्धावस्था ते मृत्यू हा फार अल्प कालावधी असतो. या अल्प कालावधीमध्ये काय करावे, काय करू नये, हे सांगणारे कुणी नसतात आणि तसे शिकवण्याची काहीच सोय नसते. त्याचबरोबर त्या व्यक्तीला वयोमानामुळे निर्माण झालेल्या शारीरिक आणि मानसिक स्थितीमुळे नवीन काही शिकणेही कठीण असते. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी केवळ स्वतःची साधनाच उपयोगी पडू शकते. यासाठी ही साधना तरुणपणातच चालू करणे आवश्यक असते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले