Uddhav Thackeray Nashik Rally : प्रचारगीतातून ‘हिंदु धर्म’ शब्द काढाला; पण फडणवीस यांचा ‘धर्मयुद्ध’ शब्द कसा चालतो ?
उद्धव ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला प्रश्न !
नाशिक : लोकसभेत शिवसेनेच्या प्रचारगीतातून ‘हिंदु धर्म’ आणि ‘जय भवानी जय शिवाजी’ हे शब्द काढायला लावणारा निवडणूक आयोग हा भाजपचा नोकर आहे. आता विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच ‘मतांचे धर्मयुद्ध करा’, असे आवाहन जनतेला करत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी आमचे शब्द गीतातून काढण्यास सांगणारा निवडणूक आयोग आता कुठे गेला ?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथील प्रचारसभेत केला आहे.
ते पुढे म्हणाले,
‘‘धर्माच्या नावाने नव्हे, तर स्वतःच्या कर्माच्या नावे मते मागा, असे आवाहन भाजपने केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी स्वतःची कर्मे पडताळली पाहिजेत. तुमचे एवढेच बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम होते, तर आमचे सरकार का पाडले ?, शिवसेना का फोडली ? बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत दिलेला शब्द अमित शहा यांनी का फिरवला ?’’