Ek Deep HinduRashtra Ka : हिंदु जनजागृती समितीचा अनोखा उपक्रम : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ !

मुंबई : त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर मंदिरात आणि घरांमध्ये दिवे लावून हिंदु बांधवांनी यावर्षीही दीपोत्सव साजरा केला. या निमित्ताने देशभरात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये स्थित त्रिपुर (दीपमाळ) प्रज्वलित केले गेले. यंदाच्या दीपोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदु राष्ट्राचा संकल्प करण्यासाठी ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ हा उपक्रम हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात राबवून जनजागृती करण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम !

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, देहली, उत्तरप्रदेश, झारखंड, पश्‍चिम बंगालसह अन्य राज्यांत हा उपक्रम पार पडला. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींसह धर्मप्रेमी आणि भाविक यांनीही यात सहभाग घेतला.

सांगली येथील धर्मप्रेमींचा उपक्रमात सहभाग
कोल्हापूर येथील धर्मप्रेमींचा उपक्रमात सहभाग

अलिबाग (रायगड) येथे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी यांचा उपक्रमात सहभाग
झारखंड येथे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी यांचा उपक्रमात सहभाग

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री शंकराने त्रिपुरासुराचा नाश केला, त्या प्रीत्यर्थ त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. आसुरी शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय म्हणून तो भारतातील बर्‍याच ठिकाणी मंदिरांतून साजरा केला जातो. सध्या समाजात असलेल्या अनिष्ट प्रवृत्ती नष्ट करून लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र यावे, या उदात्त हेतूने ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ या उपक्रमातून समाजामध्ये जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमात सहभागी झालेल्या हिंदु धर्मप्रेमींनी मंदिरे, घरे आदी ठिकाणी दीप प्रज्वलित करतांना ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ याविषयीचे फलक हातात धरून लोकांचे प्रबोधन केले. काही ठिकाणी सामूहिक दीपपूजन करतांना हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घेण्यात आली. सामाजिक माध्यमांतही हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला.