सिल्लोड येथील जनतेला भयमुक्त केल्याविना स्वस्थ बसणार नाही ! – उद्धव ठाकरे
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील सिल्लोड येथील गद्दाराचा पापाचा घडा भरला असून मी त्यांची चौकशी करून त्यांना कारागृहात डांबल्याविना आणि येथील जनतेला भयमुक्त केल्याविना स्वस्थ बसणार नाही, अशी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. सिल्लोड येथे १५ नोव्हेंबर या दिवशी येथे घेतलेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी ठाकरे यांनी महिलांना प्रतिमहा ३ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य आणि सर्वसामान्य जनतेला ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव ५ वर्षांसाठी स्थिर ठेवण्याचीही ग्वाही दिली.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सत्ताधार्यांनी स्वतःच्या मालमत्ता भरपूर करून ठेवल्या आहेत, हे यापुढे चालणार नाही. जनता एकवटली तर कुणी कितीही मोठा असला, तरी तो कोलमडून पडल्याविना रहात नाही. हा या देशाचा इतिहास आहे.