तलवारबाजीसाठी गोव्यातून सनातनचा बालसाधक कु. श्रीरंग दळवी याची निवड
जम्मू येथे १७ नोव्हेंबरपासून राष्ट्रीय शालेय खेळ स्पर्धा
पणजी – १७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत होणार्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय खेळ स्पर्धेसाठी गोव्यातून पर्वरी येथील एल्.डी. सामंत विद्यालयाचा विद्यार्थी, तसेच सनातनचा बालसाधक कु. श्रीरंग सुदेश दळवी (वय १३ वर्षे) याची निवड झाली आहे. ‘द गोवा फेंसिंग असोसिएशन’ने (गोवा तलवारबाजी संघटनेने) आयोजित केलेल्या पात्रता फेरीतून ‘ईपीईई’ या प्रकारात कु. श्रीरंगची गोव्यातून निवड झाली आहे.
जम्मू येथे होणार्या १७ वर्षांखालील राष्ट्रीय शालेय खेळ स्पर्धेत भाग घेण्यासाठी संपूर्ण गोव्यामधून १० स्पर्धक जाणार आहेत. या संघासमवेत पर्वरी येथील एल्.डी. सामंत विद्यालयातील (विद्या प्रबोधिनी) इयत्ता आठवीत शिकणारा कु. श्रीरंग दळवी याचा समावेश आहे. ही स्पर्धा एम्.ए. स्टेडियम, भगवतीनगर, जम्मू-काश्मीर येथे आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय प्रतियोगितेसाठी निवड झाल्याबद्दल कु. श्रीरंगने सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली आहे. एल्.डी. सामंत विद्यालयाच्या मुख्याध्यपिका डॉ. नीता साळुंके आणि सर्व शिक्षकवर्ग यांनी त्याचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.