‘पोर्शे’ कार अपघातातील अरुणकुमार सिंह याला १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी !
पुणे – कल्याणीनगर ‘पोर्शे’ कार अपघातातील गाडीमध्ये मागे बसलेल्या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने पालटल्याच्या प्रकरणी अरुणकुमार सिंह हा न्यायालयात शरण आला होता. अरुणकुमारने स्वत:च्या कार्यालयातील कर्मचार्याने आशिष मित्तल याला पैसे दिले होते, असे अन्वेषणातून समोर आले. आरोपी अरुणकुमार सिंह याने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो न्यायालयामध्ये शरण आला होता. १४ नोव्हेंबर या दिवशी त्याची पोलीस कोठडी संपली होती. तेव्हा त्याला न्यायालयासमोर उभे केल्यानंतर १८ नोव्हेंबरपर्यंत पुन्हा पोलीस कोठडी देण्यात आली आहे.