‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा देणे चुकीचे नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
दंगलखोरांवरील खटले मागे घेण्याच्या राजकारणाला विरोध
मुंबई – ‘बटेंगे तो कटेंगे’ (विभाजित व्हाल, तर कापले जाल) ही घोषणा देणे चुकीचे नाही. देशाचा इतिहास पाहिला, तर हा देश जेव्हा जाती, धर्म आणि प्रांत यांच्यात विभागला गेला, तेव्हाच गुलाम झालेला आहे. देश विभागला; पण जर कुणी ‘विभाजित होऊ नका, फूट पाडू देऊ नका’, असे म्हणत असेल, तर यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे ? असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेला मुलाखत देतांना केले.
ते म्हणाले…
१. जर तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी एकत्र येत असाल, तर चांगलीच गोष्ट आहे; पण लोकसभेत ‘व्होट जिहाद’ झाल्याचे पाहिले. ‘महाविकास आघाडीला मतदान केले नाही, तर अल्लाहसोबत बेईमानी आहे’, असे बॅनर त्यांच्या धर्मस्थळांवर लावण्यात आले. हा कोणता निधर्मीवाद आहे ? हे तर मोदींना विरोध करणे आहे.
२. लोकांना मंदिरात जमा करून भाजपला मत दिले नाही, तर रामाशी अप्रामाणिकपणा होईल, अशी शपथ कुणीही दिलेली नाही.
३. महाविकास आघाडी मुसलमान उलेमांचे तळवे चाटण्याचे काम करत आहे. आता मुसलमान उलेमांनीही त्यांना समर्थन दिले आहे. त्यांच्या १७ मागण्या मान्य केल्या आहेत. त्यातील एक मागणी अशी आहे की, वर्ष २०१२ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्रात ज्या दंगली झाल्या, त्यात मुसलमानांवर प्रविष्ट करण्यात आलेले खटले मागे घेतले जावेत. हे कोणते राजकारण चालू आहे ? जर आपण दंगलखोरांना सोबत घेऊन राजकारण करणार असू, तर ‘बटेंगे आणि कटेंगे’ही असेच म्हणावे लागेल.