सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय करून स्वतःमध्ये सकारात्मक पालट करणार्‍या कु. मधुरा चतुर्भुज !

‘कु. मधुरा मोहन चतुर्भूज हिला वर्ष २००४ पासून आध्यात्मिक त्रास होऊ लागला. तिने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यानंतर तिच्यामध्ये बरेच पालट झाल्याचे मला जाणवले. ते पालट येथे दिले आहेत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. वाढलेले वजन न्यून होणे

कु. मधुरा लहानपणापासून पुष्कळ चपळ आहे. आध्यात्मिक त्रास चालू झाल्यानंतर तिची शारीरिक क्षमता न्यून झाली. तिचे वजन वाढले होते. तिने नामजपादी उपाय नियमित केल्यानंतर आता तिचे वजन न्यून झाले आहे.

कु. मधुरा चतुर्भुज

२. नकारात्मक प्रसंगातून लवकर बाहेर पडता येणे

पूर्वी मधुरा एखादा नकारात्मक प्रसंग घडल्यावर सतत त्याचाच विचार करत बसायची. त्यातून बाहेर पडतांना तिचा पुष्कळ संघर्ष व्हायचा. आता ती घडलेल्या प्रसंगाचा फार वेळ विचार करत नाही आणि तिला त्यातून लवकर बाहेर पडता येते.

३. अपेक्षा उणावणे

पूर्वी मधुराला ‘स्वतःच्या मनासारखे व्हावे’, अशी अपेक्षा असायची; पण आता ती प्रत्येक प्रसंग स्वीकारते.

४. पूर्वी तिच्या चेहर्‍यावर त्रास जाणवायचा. आता ती आनंदी दिसते आणि सेवाही उत्साहाने सेवा करते.

श्रीमती माधवी चतुर्भुज

५. चुकांविषयी खंत वाटणे

पूर्वी ती कुणाला रागाने बोलली, तर क्षमा मागत नसे; पण आता तिच्याकडून चूक झाल्यावर ती कोणताही पूर्वग्रह न ठेवता लगेच क्षमा मागते. तिला चुकांची खंत वाटते.

६. संतांनी केलेले कौतुक !

अ. सद्गुरु गाडगीळकाका म्हणाले, ‘‘मधुराने घरी राहून साधनेचे प्रयत्न सातत्याने आणि चिकाटीने केले. त्यामुळे तिचा आध्यात्मिक त्रास न्यून झाला.’’ सद्गुरु गाडगीळकाकांनी मधुराचे उदाहरण अन्य साधकांनाही सांगितले आणि तिचे कौतुक केले.

आ. पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे [समष्टी] संत, वय ४९ वर्षे) म्हणाले, ‘‘मधुराच्या ठिकाणी दुसरी कुणी मुलगी असती, तर कधीच सनातन सोडून गेली असती. मधुराने त्रास अल्प होण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले. ‘तिने घरी राहून प्रगती केली’, हे विशेष आहे.’’

‘कु. मधुराची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो’, अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करते.’

– श्रीमती माधवी मोहन चतुर्भुज (कु. मधुरा चतुर्भुज यांची आई, वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.७.२०२४)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक