Drugs Seized From Porbandar : गुजरातच्या पोरबंदर किनार्‍यावर कोट्यवधी रुपयांचे ७०० किलो अमली पदार्थ जप्त !

पोरबंदर (गुजरात) – गुजरातच्या पोरबंदर किनार्‍यावर ७०० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. एका इराणी नौकेतून अमली पदार्थ आणल्याची माहिती अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने भारतीय नौदल आणि गुजरातचे आतंकवादविरोधी पथक यांच्या सहकार्याने कारवाई करत समुद्राच्या मध्यभागी ही नौका अडवली अन् अनुमाने ७०० किलो अमली पदार्थ जप्त केला. या पदार्थांचे एकूण मूल्य कोट्यवधी रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी किती जणांना अटक करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नौकेत असलेले अमली पदार्थ आणि इतर पुरावे तपासल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

संपादकीय भूमिका

अमली पदार्थांच्या व्यवसायातूनच देशाच्या मुळावर उठलेल्या जिहादी आतंकवाद, नक्षलवाद आणि अन्य प्रकारच्या गुन्हेगारीला अर्थसाहाय्य होत असते. त्यामुळे हा व्यवसाय करणार्‍यांच्या मुसक्या आवळून सरकारने त्यांना फाशी दिली पाहिजे.