पुणे येथील ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’साठी ध्वनीक्षेपकाची अनुमती
पुणे – शहरामध्ये १८ ते २२ डिसेंबर २०२४ या कालावधीत ७० वा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ आयोजित केला आहे. या महोत्सवातील २१ डिसेंबर या दिवशी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी अनुमती दिली आहे. पुणे जिल्ह्यासाठी ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यासाठी १५ दिवस निश्चित केले आहेत. त्यापैकी १३ दिवस यापूर्वीच सवलत दिली गेली आहे. शेष राहिलेल्या २ दिवसांपैकी १ दिवस ‘आर्य संगीत प्रसारक मंडळा’च्या विनंतीवरून अनुमती देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.