मंदिरांवरील विविध आघातांच्या विरोधात संघटित झालो, तरच हिंदु संस्कृती टिकेल !
गडहिंग्लज येथे मंदिर महासंघाची बैठक
गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) – मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशिला असून भक्त आणि ईश्वर यांना जोडणारा सूक्ष्म धागा आहे. यासाठीच पूर्वीच्या राजांनी मंदिरांची निर्मिती केली. त्यातून पुढे दान-धर्म यांद्वारे मंदिरातून गोशाळा, गुरुकुल शिक्षणपद्धत, समाजोपयोगी कार्य केले. आजच्या स्थितीला मात्र मंदिरांचे सरकारीकरण झाल्याने त्याचे अनेक दुष्परिणाम लक्षात येत आहेत. काही मंदिरांच्या जागा वक्फ कायद्यान्वये बळकावल्या जात आहेत. त्यामुळे हिंदू जर मंदिरांवरील विविध आघातांच्या विरोधात आता संघटित झाले, तर हिंदु संस्कृती टिकेल. त्यामुळे यापुढील काळात मंदिरांनी संघटितपणे कृती करण्याचा निर्णय मंदिर महासंघाच्या बैठकीत करण्यात आला.
विठ्ठल मंदिरात झालेल्या या बैठकीसाठी गडहिंग्लज शहर आणि परिसरातील विविध मंदिरांचे विश्वस्त आणि प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीस मंदिर महासंघाचे जिल्हा समन्वयक श्री. प्रसाद कुलकर्णी आणि हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. आदित्य शास्त्री यांनी उपस्थितांना संबोधित केले. सूत्रसंचालन सौ. विजया वेसणेकर यांनी केले, तर या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय मुरकुटे यांसह सर्वश्री शंकर बुगडे, संजय गुरव, गिरीष कुलकर्णी, अनिल शेंडे, दयानंद दळवी, सुरेश माळवी, शाम गुरव उपस्थित होते.
संपादकीय भुमिकाभक्त आणि ईश्वर यांना जोडणारा सूक्ष्म धागा असणारी अन् हिंदु धर्माची आधारशिला झालेली मंदिरे सुरक्षित रहायला हवीत ! |