जोपर्यंत देशात अखंड एकता आहे, तोपर्यंत भारताला कुणीही तोडू शकत नाही ! – माधवी लता, भाजप नेत्या

वाघोली (पुणे) येथे व्याख्यान !

माधवी लता

वाघोली (जिल्हा पुणे) – जोपर्यंत भारतात महिलांचा गौरव केला जातो, त्यांना पूजनीय स्थानावर ठेवले जाते. जोपर्यंत देशात अखंड एकता आहे, तोपर्यंत भारताला कुणीही तोडू शकत नाही, असे प्रतिपादन भाग्यनगरच्या भाजपच्या नेत्या माधवी लता यांनी येथे केले. ‘दाक्षराजी महिला मंच’च्या वतीने वाघोलीत आयोजित ‘जागर हिंदुत्व का, संकल्प शतप्रतिशत मतदान का’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. या प्रसंगी सुजाता सातव, पूजा कंद, आजमिन वाडिया आदी उपस्थित होते.

माधवी लता पुढे म्हणाल्या की, भारताला ‘सोने की चिडिया’ म्हटले जाते; कारण येथे श्रीमंत-गरीब, उच्च-नीच भेदभाव नाही; मात्र काही जण सरकार बनवण्याच्या नादात रावण बनत आहेत. त्यामुळे भारतातच मोगल निर्माण होत आहे. महाराष्ट्रातील हिंदूंनी झोपू नये. ते झोपले, तर इतर राज्यातील हिंदू नष्ट होतील. हिंदूंनी आता जागे व्हावे आणि मतदानासाठी सहस्रोंच्या संख्येने बाहेर पडावे. आता नाही, तर कधीच नाही. शहर नाही, तर देश सोडून जाण्याची वेळ तुमच्यावर होईल. आर्थिक स्थिती चांगल्या नसलेल्या महिलांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, त्यांची सुरक्षितता आम्ही करूच. दाखवून द्या की, महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य आले आहे !